तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

गोवा येथे होणाऱ्या ग्लॅमरस 50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नोंदणी सुरू
मुंबई (प्रतिनिधी) :- 
भारत सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रलायाव्दारे दरवर्षी आयोजित भारताचा आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सव-आंचिम (ईफ्फी) ची प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. सिनेमा नाट्य क्षेत्रातील व्यावसायिक, पत्रकार, सिनेमा रसिक आणि विद्यार्थी यांनी सदर महोत्सवात सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी असे चित्रपटकर्मी आणि जेष्ठ समीक्षक करण समर्थ यांनी आवाहन केले आहे.
यावर्षी हा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-आंचिम आपले ५० वे म्हणजेच अर्धशतक साजरे करणार आहे. यंदाच्या २० नोव्हेंबर पासून गोव्यातील पणजी शहरात ईफ्फी मोठ्या धूमधामीत आयोजित होणार आहे.
दिंनाक 20 ते 28 नोव्हेंबर 2019 या आठ दिवसांमध्ये गोव्यातील पणजी शहरात आयोजित होणारा ईफ्फी हा आशियातील सर्वाधिक मोठा चित्रपट महोत्सव मानला जातो. जगभरातून साधारण पंधरा हजार पेक्षा अधिक संख्येने सिनेमा सृष्टीतील मान्यवर, पत्रकार आणि सिनेमाप्रेमी ईफ्फीमध्ये आपली उपस्थिती लावतात.
साधारण साठ वर्षांपूर्वी  म्हणजेच1952 साली पहिला भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - ईफ्फीचे आयोजन केवळ आतंरराष्ट्रिय नकाशावर भारताला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी नभोवाणी मंत्रालयाने सुरूवात केली. भारतासारख्या अवाढव्य देशाला आतंरराष्ट्रिय नकाशावर भारताला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी चित्रपट माध्यमाचा उपयोग करावा लागला यावरूनच चित्रपट या माध्यमाचे महत्त्व समजावून घेतले पाहिजे.
'यंदा महोत्सवाचे अर्ध शतकी महोत्सवी म्हणजेच 50वे वर्ष आहे यामुळे यंदाचा ईफ्फी महोत्सव अधिक सिनेमा तारकांच्या उपस्थितीत ग्लॅमरस होणार आहे. हा पन्नासावा ईफ्फी सिने रसिकांना आगळ्यावेगळ्या चित्रपटांची मेजवानी तर देणारच आहे पंरतु इतर विविध कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले आहे. तसेच यंदा पणजी शहरासह गोव्यातील इतर दहा शहरांमध्ये ही ईफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यात समजणार्‍या या नेत्रदीपक 50वा ईफ्फीचे आपण साक्षीदार व्हावे असे मला मनापासून वाटते', असेही करण समर्थ यांचे म्हणणेआहे.
आयोजकांच्या www.iffigoa.org आणि www.myiffi.org या संकेतस्थंळावर ही नोंदणी सुरू आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment