तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

हाळम फेस्टिव्हल अंतर्गत विविध शैक्षणीक स्पर्धांचे वितरण;51 हजाराची रोख बक्षिसे वाटप हाळम फेस्टिव्हलमधील विजेते विद्यार्थी भविष्यात मोठे यश मिळवतील-माधव मुंडे


विद्यार्थी भविनाथ आठ दिवसापासुन सुरु असलेल्या हाळम फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या वकृत्व , निबंध, रांगोळी ,खो खो ,कबड्डी आदी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
फेस्टिव्हल आयोजनामागीची भुमिका स्पष्ट करताना संयोजक माधव मुंडे यांनी हाळम फेस्टिव्हलमध्यील स्पर्धामध्ये बक्षीस मिळविलेले किंवा सहभाग नोंदविलेले विद्यार्थी भविष्यात मोठ्या स्पर्धेत यशस्वी ठरतील असे सांगीतले.यावेळी एकुण 51 रु.ची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली.

 हाळम येथे सोमवार दि.8 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक ,कवी सोपान हाळमकर तर प्रमुख अतिथी म्हणुन जेष्ठ नेते देवनाथ दहिफळे, हरीचंद्र महाराज, संथापक माधव मुंडे, उपस्थित होते  या स्पर्धेसाठी  परीक्षक म्हणुन  गित्ते सर, मुगे सर, शेख सर ,महाजन सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्क्षय गणेश दहिफळे, संतोष मुंडे, संतोष गुट्टे, जगन्नाथ मुंडे, अजय गित्ते, संतोष गुट्टे, संभाजी गुट्टे, गणेश गुट्टे, प्रल्हाद मुंडे,बळीराम मुंडे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कवी सोपान हाळमकर यांनी आपल्या भाषणात हाळम फेस्टिव्हल च्या माध्यमातुन आयोजीत करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धेमुळे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळत आहे.अशा छोट्या छोट्या स्पर्धामधुन विद्यार्थ्यामध्ये पुढील आयुष्यात मोठ्या स्पर्धांना सामोरे जाण्याची ताकद येते.हाळम फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम परळीच्या ग्रामीण भागातील बदलत्या समाजमनाची साक्ष देतात असे सांगीतले.या बक्षीस वितरण कार्यक्रमास विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment