तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

माझ्या काळातील विकास कामांच्या खुणा दिसतात, मात्र मागील 5 वर्षातील विकास काम कुठेच दिसत नाही- पंडीतराव दौंड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11........... 30 वर्षांपूर्वी परळी भागाचे (जुन्या रेणापूरचे) प्रतिनिधीत्व करताना मी केलेल्या विकास कामांच्या खुणा आजही मतदारसंघात दिसतात, मात्र मागील 5 वर्षात परळीच्या आमदाराला  मंत्रीपदाची संधी मिळूनही 5 वर्षातील विकास काम कुठेच दिसत नसल्याची खंत माजी मंत्री पंडीतराव दौंड यांनी व्यक्त केली आहे.

82 वर्ष असले तरी आजही तरूणाच्या उत्साहात माजी मंत्री पंडीतराव दौंड हे परळी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून 30 वर्षांपूर्वीच्या आपल्या सहकार्‍यांना भेटणे, त्यांना आवाहन करणे, नवीन मतदारांशी राजकारणातील नव्या-जुन्या गोष्टी सांगत ते हिरीरीने प्रचार करताना पहायला मिळत आहेत. मला 85 ते 90 अशी एक वेळा रेणापूरच्या जनतेने संधी दिली, काही काळ राज्यमंत्रीपदही मिळाले. त्या काळात मी केलेल्या विकास कामांच्या खुणा आजही कायम असल्याच्या गावकरी सांगतात. मात्र मागील 5 वर्षातील काम मात्र कुठेच दिसत नाही, याचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 
मंत्रीपदासारखी मोठी संधी लाभूनही परळीच्या आमदाराला विकास करता आला नाही, याचे आश्यर्च आणि खंतही वाटते. दुसरीकडे सत्ता नसतानाही विरोधी पक्षात राहूनही धनंजय मुंडेंनी केलेले कामही ठळकपणे जाणवते, त्यामुळेच त्यांना आता संधी दिली पाहीजे, असे दौंड म्हणातात. जळगव्हाण येथे त्यांनी मातंग समाजातील कैलास क्षीरसागर यांची भेट घेवून त्यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या विजयाचा शब्द घेतला.

No comments:

Post a Comment