तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पावसात मतदारांशी साधला संवाद ; ताईसाहेब, तुमच्यामुळेच मतदारसंघाला चांगले दिवस ; तुमच्यावर मतांचा पाऊस पाडूलेकीच्या स्वागतासाठी  महिला, पुरूषांच्या बरोबरीने आबालवृद्धही मागे हटले नाहीत

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. ११ ------धो,धो कोसळणारा पाऊस, खळाळून वाहणारे पाणी, कडाडणाऱ्या विजा आणि सुसाट वारा अशा निसर्गाच्या रूद्र अवतारातही परळी विधान सभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार  ना. पंकजाताई मुंडे यांनी काल अंबाजोगाई तालुक्यातील मतदारांशी थेट संवाद साधला.  विशेष म्हणजे अशा तुफानी वातावरणातही, भर पावसात रस्त्यावर थांबुन अबालवृद्ध, महिला - पुरूषांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत केले. "ताईसाहेब, तुमच्या मुळे मतदारसंघाला चांगले दिवस आले आहेत,  आम्ही सुद्धा वरूणराजा प्रमाणे तुमच्यावर मतांचा पाऊस पाडू" असे असा शब्द मतदारांनी दिला. तर भर पावसात झालेल्या स्वागताने भारावलेल्या ना. पंकजाताईंनीही त्यांच्यावर धरलेली छत्री बाजूला सारून "अशा वादळ वाऱ्याला घाबरणारी नाही. माझ्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे रक्त आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करीन" असे उदगार ना. पंकजाताई मुंडे यांनी काढले.
      
धुंवांधार पाऊस सुरू असतानाही गुरूवारी रात्री  ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव, भारज आणि लिंबगाव या गावात जाऊन नागरीकांशी संवाद साधला. यावेळी भर पावसात महिला मोठय़ा संख्येने ताईंच्या स्वागतासाठी थांबल्या होत्या, मी तुमच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून काम करायचे आहे. कधी नव्हे एवढा विकास मी मंत्री झाल्यापासून केला आहे. गावोगावी आणि गल्लोगल्ली चांगले रस्ते झाले आहेत. विकासात दळणवळणला महत्त्व असते आणि त्यासाठी रस्ते चांगले असावे लागतात. आपल्या भागातील सर्वच रस्ते चांगले केले आहेत. विकासासाठी जे आवश्यक आहे ते सर्व मी केले आहे. विकासाची गंगा अगदी गोरगरीबांच्या दारापर्यंत आणली आहे असे सांगून आगामी काळात युवकांच्या हाताला काम देणारे उद्योग या भागात आणायचे असुन शेत मालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
     लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर आणि माझ्यावर या भागाने नेहमी प्रेम केले आहे. पुढील काळात ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आपण मला आशिर्वाद द्यावेत असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. तुम्ही पावसात असताना मी छत्री कशी वापरू असे म्हणत त्यांनी छत्री बाजूला सारून महिलांशी विविध विषयांवर चर्चा केली.

मतांचा पाऊस पाडण्याचा निर्धार

ताईसाहेब, तुम्ही भर पावसात आमच्याशी संवाद साधण्यासाठी आल्या आहात. आम्हीसुद्धा तुमच्यावर मतांचा पाऊस पाडू असा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला. महिलांनीही उत्स्फूर्तपणे ताईंचे स्वागत करून आमच्या आणि मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या सोबतच राहणार आहोत असा शब्द महिलांनी दिला.  या दौऱ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, राजाभाऊ औताडे, शामराव आपेट, गणेश कराड, महादेव फड यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच व नागरीक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment