तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

दगडापेक्षा वीट मऊ, चला पंकजाताईला निवडून देऊ!; कोपर्‍या कोपर्‍यावर रंगली चर्चा, विकासाला गती दिल्याने नागरिकांकडून कौतुक

 प
रळी वैजनाथ (प्रतिनिधी):- दि. ६......
      "दगडापेक्षा वीट मऊ" हे वाक्य परळी मतदार संघात चांगलेच चर्चिल्या जात आहे. त्याला जोडुनच " दगडापेक्षा वीट मऊ, चला पंकजाताईला निवडून देऊ" असा सुर आळवला जाऊ लागला आहे. सध्या कोपर्‍या कोपर्‍यावर जिथे चारचौघे जमा झाले तिथे हेच ऐकायला येऊ लागले आहे. पालकमंत्री म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांनी विकासाला चांगलीच गती दिली असुन विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भाग विकासाच्या प्रवाहात आणल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. एकप्रकारे ना. पंकजाताई मुंडे यांची निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
      ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या एक दोन भाषणात " दगडापेक्षा वीट मऊ म्हणून मला निवडून देणार असल्याचे बोलले जाते. पण मी तर वीट सुद्धा नाही आणि वीट असेल तर विठ्ठूमाऊलीच्या पायाखालची वीट व्हायला आवडेल" असे म्हटले. तेंव्हापासून परळी मतदार संघात " दगडापेक्षा वीट मऊ, चला पंकजाताईला निवडून देऊ" अशीच चर्चा रंगू लागली आहे. ग्रामीण भागातील पारावर आणि शहरातील कोपर्‍या कोपर्‍यावर जिथेही चार चौघेजण एकत्र येतील तिथे आता हीच चर्चा ऐकायला मिळत आहे. ना. पंकजाताई मुंडे या आमदार आणि कॅबिनेट मंत्री झाल्यापासून शांत आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. दहशत, गुंडगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचे नागरीक उघडपणे बोलू लागले आहेत. पुर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत झाल्याचे महिला जाहीरपणे बोलू लागल्या आहेत. बाजारपेठेत उधारीवर सामान नेऊन पैसेच न देणे, धमक्या देऊन फुकटात खरेदी करणे अशा प्रकारांना चांगलाच आळा बसला आहे.
      शाळा, महाविद्यालयातही निर्भीड वातावरण निर्माण झाले आहे. मुलींचे शैक्षणिक प्रमाण वाढले आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे महिलांचा सन्मान वाढला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक, राजकीय कार्यक्रमातील सहभाग वाढला आहे. परळीत शांतता नांदू लागल्याने ना. पंकजाताई मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांचा सन्मान वाढल्याने ना. पंकजाताई मुंडे या त्यांच्यासाठी आयकॉन बनल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या महिलांमध्येही ना. पंकजाताई यांच्याबद्दल आदराची भावना असल्याचे दिसत आहे. याचा फायदा निवडणूकीत नक्कीच होणार आहे.

No comments:

Post a Comment