तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

गेवराई : विकासाला चालना देण्यासाठी पंडितांचा पराभव - आ. लक्ष्मण पवारसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १९ _ संधी दिली तेव्हा पासून गेवराई मतदार संघातील जनतेला विश्वासात घेऊन मतदार संघाचा चौफेर विकास केला आहे, आणि चालु असलेल्या विकासाला चालना देण्यासाठी मतदारांना पंडितांचा पराभव करावाच लागेल असे आवाहन आ. लक्ष्मण पवार यांनी चकलंबा येथील जाहीर सभेत बोलताना केले आहे.
            पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकवेळी वेग वेगळ्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून विजयसिंह पंडितांनी अध्यक्षपद असतांना काय दिवे लावले आहेत असा सवाल आ. लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना केला. गेवराई मतदार संघातील जनतेने गेली अनेक वर्षांपासून त्या परिवाराला सत्तेत पाठवले परंतु जनतेला वेठीस धरण्यापलीकडे त्यांनी काय दिले. जिल्हा परिषद गटासह गेवराई मतदारसंघ विकासापासून वंचित का ठेवला व दिलेल्या वेदनांंना अजुनही जनता विसरलेली नाही, त्यामुळे वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारे विजयसिंह पंडितांना या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून आम्ही मिळालेल्या संधीचा उपयोग जनकल्याणासाठीच केला. २००६ पासून गेवराईकरांनी आमच्या परिवाराला नगर पालिकाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी दिली तेव्हा पासून गेवराई शहरातील परिस्थिती पुर्णत्व बदल झाला आहे, त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेने आम्हाला गेवराई तालुक्याच्या राजकारणात आणले. तेव्हा पासून आम्ही शासनाने दिलेल्या निधीचा उपयोग जनकल्याणासाठीच केला आहे. गेवराई मतदार संघातील दर्जेदार विकास कामे जनतेच्या समोर आहेत, त्यामुळे आमच्या विकासावर जनतेचा विश्वास आहे. होऊ घातलेल्या या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनता मला आशिर्वाद देईल असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.  यावेळी मोहनराव काळे, महेश दाभाडे, जे.डी.शहा, याहिया खाॅन, सचिन मोटे, बाळासाहेब सानप, अजय दाभाडे आदि उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment