तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जबरदस्तीने हटवुन अपमान करणार्‍यांना समाजाची मते मागण्याचा अधिकार आहे का? माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर यांचा सवालबाबासाहेबांचा अपमान करणार्‍या राष्ट्रवादीला धडा शिकवण्याचे केले आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     शहराच्या सोमेश्वर भागात असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पोलीस बळाचा वापर करून हटवला आणि दलित समाजाला अपमानित केले अशा लोकांना दलित समाजाची मते मागण्याचा अधिकार तरी आहे का? असा सवाल करून बाबासाहेबांचा अपमान करणार्‍यांना समाजबांधवांनी धडा शिकवावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर यांनी केले आहे.
     वैजनाथ जगतकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हाच घरा जातीयवादी आणि दलित विरोधी पक्ष आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ते नेहमी द्वेष करीत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. दलित विरोधी सवर्ण हे वाद त्यांच्याच सत्तेत जास्त झाले. तरीही ते दलित समाजाबद्दल पुतनामावशीचे प्रेम दाखवून समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांचे हे बेगडी प्रेम जनता ओळखुन आहे. सोमेश्वर नगर येथे समाजबांधवांनी कुणाचीही मदत न घेता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला होता. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर करून दलित बांधवांवर दबाव आणून हा पुतळा हलवला. यामुळे समाजात तिव्र संताप आहे.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जबरदस्तीने हटवुन समाजाचा अपमान करणार्‍यांनी दलित समाजाकडे मत मागायला अधिकार तरी आहे का? असा सवाल करून समाजाने अशा लोकांपासून सावध रहावे आणि समाजाच्या अपमानाचा बदला घ्यावा असे आवाहन करून सर्व समाजाला सोबत चालणाऱ्या ना. पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी असे आवाहन वैजनाथ जगतकर यांनी केले आहे.

No comments:

Post a comment