तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी बंजारा समाजाची एकजूट ; पोहरादेवी तीर्थक्षेत्राला निधी दिला, तांड्यानाही न्याय देण्याची भूमिका - ना.पंकजाताई मुंडे

 पर


ळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      पाचशे लोकवस्तीच्या तांड्यांना ग्राम पंचायतचा दर्जा देऊन तांड्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात बोलताना दिला. "ताई, तुम्हाला मताधिक्य देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू" असा शब्द बंजारा समाज बाधवांनी दिला. यावेळी महिला आणि युवकांची मोठी उपस्थिती होती.
      ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ समाजाचा मेळावा अक्षता मंगल कार्यालयात घेण्यात आला. यावेळी मतदार संघातील तांड्यावरून कार्यकर्ते आले होते. ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, बंजारा समाजाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी नेहमी संघर्ष केला. बंजारा समाजाचे आणि मुंडे साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचाच वारसा मी चालवत आहे. पोहरादेवी संस्थानला साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना मोठा निधी दिला, मी देखील निधी देऊन विकासाला चालना दिली. आगामी काळातही मी पोहरादेवी संस्थानच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करून देणार असल्याचा शब्द दिला.
      बंजारा समाजाचे तांडे विकासापासून दूर होते माञ मी तांड्याच्या विकासाला चालना दिली. अनेक कामे मार्गी लावले आहेत. तांड्याच्या विकासाला गती देण्यासाठी ज्या तांड्याची लोकसंख्या पाचशे पेक्षा जास्त आहे त्यांना ग्राम पंचायतीच्या दर्जा देण्याचा प्रस्ताव असुन त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेते तुम्ही मला आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोहरादेवी संस्थानचे रामलिंग महाराज, वसंतराव नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष देविदास राठोड, जेष्ठ नेते भाऊराव चव्हाण, गोपीनाथ पवार, काशिनाथ राठोड, मधुकर राठोड, परसराम पवार, शहाजी चव्हाण, किशन जाधव, संजय राठोड, बंडू राठोड, हनुमंत पवार, बाबुराव राठोड, संतोष राठोड, दिलिप राठोड, रमेश राठोड, वैजनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पप्पू चव्हाण यांनी तर संचलन संतोष राठोड यांनी केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment