तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

परळीच्या सर्वांगीण विकासासाठी धनंजय मुंडेंना विजयी करा- नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, सोमनाथअप्पा हालगे यांचे आवाहन


 प
रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.18..... परळी शहराचा सर्वांगीण विकास करण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यामध्येच असल्याने त्यांना परळीतील जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे यांनी केले आहे.
स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे अतिशय निकटचे सहकारी असणारे सोमनाथअप्पा हालगे यांनी पंकजाताई मुंडे यांच्या कारभाराला कंटाळून 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षानेही त्यांच्या ज्येष्ठत्वाचा, कर्तृत्वाचा आणि स्व.पंडीतअण्णा मुंडे कुटुंबियांशी असणार्‍या स्नेहपूर्ण संबंधाचा विचार करून नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणूकीत संधी दिली. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नी सौ.सरोजनीताई हालगे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडणूनही आणले आणि सोमनाथअप्पा हालगे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही नियुक्त केले.
धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली हालगे दाम्पत्यांनी शहर विकासाच्या कामात स्वतःला झोकून दिले असून, शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत आहेत. ही विकास कामे, तसेच पंकजाताईंकडून विकासात होणारी नगरपालिकेची अडवणूक या मुद्यांची माहिती देत हे दाम्पत्य मतदारांना धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहे. शहरासारखाच विकास संपूर्ण मतदारसंघात हवा असेल तर, अडी-अडचणीच्या काळात धावून येणार्‍या धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a comment