तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

परळीच्या विकासासाठी ना.पंकजाताई मुंडे यांना बहुमताने विजयी करा-राजेश गित्ते


 भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या काँर्नर बैठका, प्रचार फेरींना प्रचंड प्रतिसाद ;  ग्रामीण भाग झाले कमळमय

सुरक्षित, समृद्ध भविष्यासाठी पंकजाताईंना प्रचंड मतांनी निवडून द्या-राजेश गित्ते 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते यांचा.परळी तालुक्यात दादाहारी वडगाव गटात झंझावती दौरा करत अनेक गावात कॉर्नर बैठका, प्रचार फेरींना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  परळीच्या विकासासाठी भाजपाच्या लोकसभा उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांना मतदार बहुमताने निवडून देतील. तसेच मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये विकास कामाचा डोंगर उभा करून सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. सुरक्षित, समृद्ध भविष्यासाठी पंकजाताईंच्या पाठीशी जिल्हयातील सुजान नागरीकांनी ऊभे राहून आपलेच नेतृत्व मोठे करावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केले. 

     भाजपा - शिवसेना - रिपाई - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी विधान सभेच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे  यांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या उपस्थितीत दादाहारी वडगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी दोन वेळेस प्रचार फेरी काढून पिंजून काढला आहे. गटातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. घरोघरी पोस्टर, बॅनर, पॉम्पलेट पोंहचत असल्याने ग्रामीण भाग कमळमय झाले आहे. दादाहारी वडगाव गटातील मांडवा, मरळवाडी , मलकापूर, कौठळी,  बेलंबा, लोणारवाडी,  सेलू (प.), लोणी,  दा.वडगाव, दगडवाडी, धारावती-वैजवाडी, मिरवट,  कासारवाडी, नंदनज, सारडगाव आदी ठिकाणी जाऊन मतदारांशी डोअर टु डोअर जाऊन संवाद साधला. ना.पंकजाताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. घरोघरी जाऊन मुंडे भगिनींनी केलेल्या कामाची माहिती दिली. सकाळ पासुन ते रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधत आहेत.  गटात संपर्क कार्यालय काढून राजेश गित्ते ना.पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी ठाण मांडून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत. दरम्यान लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यावर या दादाहारी वडगाव  जिल्हा परिषद गटातील मतदारांनी नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांना अभिप्रेत काम करत असताना पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याच्या व परळी मतदारसंघाच्या विकासासाठी भरिव असा निधी देण्यात आला. परळी विधानसभा मतदारसंघात महामार्गाचे व रस्त्यांचे प्रशस्त जाळे निर्माण करण्यात आले. त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. 
 सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास मतदार करत आहेत. ना.पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हा व परळी मतदार संघासाठी अभूतपूर्व निधी आणला असून सर्वसामान्यांच्या विकासासाठी पंकजाताई अहोरात्र प्रयत्न करीत आहेत अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजाताईंच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी व उद्याच्या सुरक्षित, समृद्ध भविष्यासाठी पंकजाताईंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला.
ना.पंकजाताई मुंडे आमची लाडकी लेक असुन आम्ही त्यांना मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताधिक्य देणार असल्याची ग्वाही मतदारांनी दिली. गटात आपल्या घरचा उमेदवार अशी भावना निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे तर चोहीकडे पंकजाताईचीच लाट असल्याचा दावा मतदारांनी केला आहे.  परळी तालुक्यातुन  सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण सर्व जण मिळुन एक दिलाने काम करून ताई साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणु असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या व परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ना.पंकजाताई मुंडे यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भाजपा युवा नेते राजेश गित्ते व गटातील  भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध आघाडी, बुथ प्रमुख यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment