तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

डॉ जगदीश शिंदे यांच्या पदयात्रेला जाेरदार प्रतिसादप्रतिनिधी
पाथरी:-निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्यात प्रत्येक उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत.पाथरी मतदार संघात प्रस्तापित उमेदवारा विराेधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरत मात्तबर असलेल्या उमेदवारां पुढे डॉ जगदीश शिंदे यांनी तगडे आव्हाण उभे केले असून दिवसें दिवस तरूणांचं पाठबळ डॉ शिंदेच्या पाठिशी उभे राहातांना दिसत असून शनिवारी पाथरी शहरातून पदयात्रा काढून मतदारां संपर्क केला.
सकाळी आेंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पासून पदयात्रा निघाली. या वेळी अजारी असलेल्या एका छाेट्या बालकाला रस्त्यातच आजारा विषयी विचारपुस करत आेषधी लिहून दिल्या.या नंतर मुख्य रस्त्याने श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात दर्शन घेत संपुर्ण शहर,माळिवाडा मुख्य महामार्गावरून पदयात्रा काढत शहरवाशियांनी मतदान रुपी आशिर्वाद देण्याचे आवाहन डॉ शिंदे यांनी केले.या वेळी माेठ्या संखेने डॉ शिंदे यांचे समर्थक या पदयात्रेत सहभागी झाले हाेते.दिवसें दिवस भुमीपूत्र म्हणून निवडणुक लढत असलेल्या डॉ शिंदे यांना शहरातून आणि ग्रामिण भागातून ही माेठे पाठबळ मिळतांना दिसत आहे.या नंतर ते साेनपेठ कडे पदयात्रा काढण्या साठी रवाना झाले.

No comments:

Post a comment