तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

धनंजय मुंडेंची शुक्रवारी घाटनांदूर, बर्दापूर येथे प्रचार फेरी; जवळगांव, नांदगाव, लिंबगाव येथेही घेणार मतदारांच्या भेटीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.10.............. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे हे उद्या शुक्रवार दि 11 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांंदूर, बर्दापूर  येथे प्रचार फेरी द्वारे मतदारांचे आशीर्वाद घेणार आहेत. तसेच जवळगाव, नांदगाव, लिंबगाव येथील मतदारांनाही ते भेटणार आहेत. 

सकाळी 08 वा. घाटनांदूर गावातून निघणार्‍या प्रचार फेरीत ते सहभागी होणार असून, घाटनांदूर मधील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत जावून ते आवाहन करणार आहेत. दुपारी 01 वा. जवळगाव येथील मतदारांना भेटणार असून, सायं 05 वा. नांदगाव तांडा येथे तर सायं 06 वा. नांदगाव येथील मतदारांना भेटणार आहेत. सायं 07 वा. ते बर्दापूर या गावातील प्रचार फेरीत सहभागी होणार असून, त्यानंतर लिंबगाव येथील मतदारांना भेटणार असल्याचे संपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे. 

या प्रचार फेरीत व दौर्‍यात काँग्रेस व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment