तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

शेतकरीत,युवकांच्या भवितव्या साठी मैदानात-डॉ शिंदे
प्रतिनिधी
पाथरी:-माझा बाप शेतकरीच आहे. लहान पणी मीे आई-वडीलांनी केलेले कष्ट पाहिलेत.दहाविला नापास झाल्यास वडीलांनी म्हैस घेऊन दिली मीही अनुभव घेतला त्या नंतर मेहनत घेत डॉक्टर झालाे. आपल्याच लाेकांची सेवा करायची या हेतूने पाथरी,मानवत येथे दवाखाने सुरू करून जनतेची सेवा करत आहे. या दहा वर्षात पाहाताेय की राजकीय पुढारी कशा प्रकारे जनतेला धाेके देतायत.मी दहा वर्षा पासून हे सर्व अनुभवल्यानेच तुमच्या साठी निवडणुक लढताेय तुमच्या अपेक्षांना कधीच तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार डॉ जगदीश शिंदे यांनी विटा येथे ग्रामस्थांशी संवाद साधतांना केले.

या वेळी त्यांच्या साेबत कुनबी समाजाचे जिल्हाउपाध्यक्ष गाेपिनाथ जाधव, पारधी समाज अध्यक्ष सतिष शिंदे, डॉ गजानन शिंदे, राजेश माेरे, रावसाहेब निकम, सतिष पौळ, दिलिप टेकाळे,बालासाहेब टेकाळे, ज्ञानेश्वर थाेरे, लखन टेकाळे यांची उपस्थिती हाेती. पुढे बाेलतांना डॉ शिंदे म्हणाले की, शेतकरी,कष्टक-यांना,युवकांना  राजकीय मंडळी ग्रहित धरतात एकदा मत घेऊन गेले की समस्या तश्याच राहातात. राजकीय अनास्थे मुळेच दुष्काळ असतांना दाेन वर्षाचा पिकविमा मिळाला नाही.आपण आंदाेलने केली पण उपयाेग झाला नाही.आपल्या नेत्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर पिकविमा मिळाला असता मात्र ताे शेतक-यांना  मिळाला नाही पाहिजे हीच या लाेकांमा मानसिकता यातून स्पष्ट हाेत असल्याचा आराेप त्यांनी या वेळी केला.या पुढे मी कायम तुमच्या साेबत असेल शेती सह उद्याेग,व्यवसाय वाढी साठी आपण काम करू असे ते म्हणाले.या वेळी माेठ्या संखेने ग्रामस्थ आणि तरूण माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

No comments:

Post a Comment