तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

निराधारांचा आशिर्वाद तीन पिढ्यांना कमी पडणार नाही-हभप इंदाेरीकर महाराजप्रतिनिधी
पाथरी:-काळ्या आईची,माईची आणि गाईची सेवा म्हणजेच देवाची सेवा सेवा काेणाची करा ती देवाचीच असते. डॉ जगदीश शिंदे साहेबांनी निराधारांची सेवा केली आहे.या निराधार वृद्धांच्या आेठा वरील हास्या मुळे डॉ शिंदे यांना तीन पिढ्या काहिच कमी पडणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदाेरीकर यांनी बुधवारी डॉ जगदीश शिंदे यांच्या आेंकार वृद्धाश्रमाच्या विस्तारीकरण आणि स्थलांतर कार्यक्रमा निमित्त आयाेजित किर्तन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी हभप हरीशचैतन्य महाराज डॉ जगदीश शिंदे आणि त्यांचे सहकारी उपस्थित हाेते. पुढे बाेलतांना ते म्हणाले की,वृद्धाश्रमात धनदाडग्यांचेच आई-बाप असतात गेली सहा वर्षा पासून दुष्काळ आहे.शेतक-यांच  सगळं गेलं पण त्यांनी प्रामाणिक पणे म्हाता-या  आई-बापाची  सेवा केली ताेच हे करू शकताे.शेतकरी निसर्गावर अवलंबुन आहे म्हणून खचलाय त्याला मुबलक पाणी द्या ताे ताे काेणाला विचारनार नाही.ताे पिकवताे दर तुम्ही ठरवता त्या मुळे शेतकरी संकटात आहे. कुठलाही स्वार्थ न ठेवता डॉक्टरांना या निराधार वृद्धांच्या चेह-यावर  हास्य फुलवलं आहे. हे आशिर्वाद तीन पिढ्यांना कमी पडू देणार नसल्याचे ही ते या वेळी म्हणाले.
तत्पुर्वी बाेलतांना डॉ जगदीश शिंदे म्हणाले की, माझा वैद्यकीय व्यवसाय जाेरात सुरू आहे पाचपाच हॉस्पिटलच्या माध्यमातून माझा व्यवसाय सुरू असतांना समाजात चाललेली ही स्थिती पाहून शेतकरी,कष्टकरी, गाेरगरीबां साठी काहीतरी करावं म्हणून समाजकारणात सक्रीय झालाे.अनेक चांगले उपक्रम राबवले. माझ्या विषयी कधी काेणाची तक्रार नाही. अनेकांना राेजगार दिला,शेतक-यांना मदत करताेय, हजाराे रुग्नांची सेवा केली माेफत आैषधाेपचर, शस्रक्रीया केल्या. हे करत असतांना साेबत काम करणा-या सामाजिक क्षेत्रातील मित्रांनी आणि माझ्या सहका-यांनी  तुझ्या सारख्या माणसांची राजकारणात गरज असल्याचे सांगितल्याने आपण सक्रीय राजकारणात मागिल काही महिण्या पासून आलाे आहाेत.यात तुम्हा सर्वांची गतीने सेवा करण्याची मना पासून इच्छा असून हे जे चाललंय ते सर्व बदल्या शिवाय शांत बसनार नसल्याचे डॉ शिंदे या वेळी बाेलतांना म्हणाले. राजकारणाली गुत्तेदारी संपवणार असे ही ते या वेळी बाेलतांना म्हणाले. या कार्यक्रमा साठी हजाराेंच्या संखेत महिला पुरुषांची उपस्थिती हाेती.

No comments:

Post a comment