तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

निवडणूक निरीक्षक भंवरलाल मेहरा यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी


खामगांव व जळगांव जामोद मतदार संघातील मतदान केंद्र
बुलडाणा, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक निरीक्षक (सामान्य) भंवरलाल मेहरा दाखल आहेत. त्यांच्याकडे खामगांव, जळगांव जामोद व मेहकर विधानसभा मतदासंघाची जबाबदारी आहे.  त्यांनी  11 ऑक्टोंबर 2019 रोजी खामगांव व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. यामध्ये जळगांव जामोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा मतदान केंद्र, पिंपळगांव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्र,  जिल्हा केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा आसलगांव, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा खेर्डा, बुरूंगले विद्यालय शेगांव, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर परिषद प्राथमिक शाळा शेगांव यांचा समावेश आहे.  
  त्याचप्रमाणे 10 ऑक्टोंब रोजी मेहकर, जळगांव जामोद व खामगांव विधानसभा मतदारसंघातील इव्हिएम व व्हिव्हिपॅट यांच्या रँण्डम पद्धतीच्या जोडणीवेळी संबंधित ठिकाणी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधींसुद्धा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment