तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 25 October 2019

धनंजय मुंडे यांची विजयानंतर परळीकरांना पहिली भेट ; दिवाळीत मिळणार नळाचे पाणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 25 ---- मागील आठ महिन्यांपासून पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या परळीकरांसाठी एक खुशखबर असून येत्या दोन दिवसात म्हणजे ऐन दिवाळीत शहरातील नागरिकांना नळाचे पाणी मिळणार आहे. मागील चार दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे वान धरणात पंधरा टक्के पाणीसाठा आल्यामुळे येत्या दिवाळीत  परळीकरांना नळाने पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सौ. प्राजक्ता भाऊसाहेब कराड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दमदार यशानंतर धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिलेली ही पहिली भेट असल्याचे प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

विधानसभेवर धनंजय मुंडे निवडून येताच परळीकर जनतेला अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली असून मागील चार दिवसांपासून परळीत दमदार पाऊस पडत आहे . त्याची परिणीती म्हणून  परळीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 15 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे त्यामुळे आता परळी करांना नळाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

आज दुपारी स्वतः धनंजय मुंडे यांनी वाण धरणातील पाण्याचा आढावा घेऊन नगरपालिकेला याबाबत तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी च्या सूचना दिल्या. याबाबतची तांत्रिक जोडणी व इतर बाबी आज नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केल्या.  त्यामुळे या दिवाळीत परळी करांना नळाचे पाणी पाणी नळाचे  पाणी मिळणार आहे.

 मागील आठ महिन्यांपासून वाण धरण कोरडे पडल्यामुळे संपूर्ण शहराची तहान नगर पालिकेच्या टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाण्यावर  भागत आहे.  याशिवाय धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने शहरात 250 पेक्षाही अधिक विंधन विहिरी घेऊन त्यावर पाइपलाइन करून पाणी  पाणीपुरवठा करण्यात आला तसेच नाथ प्रतिष्ठानने  स्वतःची अनेक टँकर देऊन परळीकरांची तहान भागवली व ऐन दुष्काळातही  पाण्याची टंचाई जाणवू दिली नाही. याच कामाची पावती म्हणून परळीकरांनी त्यांना भरघोस मतदान केले, साथ दिली आणि निकाल जाहीर होताच निसर्गानेही धनंजय मुंडेंना  साथ देत दमदार हजेरी लावल्यामुळे धरणात पाणी आले आहे आणि धनंजय मुंडे यांचा एकेक शब्द शब्द पूर्ण होण्यास सुरुवात होऊ लागली आहे.

No comments:

Post a comment