तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 October 2019

धनंजय मुंडेंचा झंझावात आजपासून महाराष्ट्रात

सोलापूर जिल्ह्यात घेणार 3 सभा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.13................ राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा विधानसभा निवडणूकीसाठी सोमवार दि.13 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात झंझावाती प्रचार दौरा सुरू होत असून, पहिल्या दिवशी ते सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 मतदारसंघातील उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. 

सकाळी 10 वाजता माळशिरस येथे उत्तमराव जानकर यांच्या प्रचारार्थ, दुपारी 12 वाजता भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ कासेगाव, ता.पंढरपूर येथे, तर दुपारी 03 वाजता मोहोळ मतदारसंघातील उमेदवार यशवंतराव माने यांच्या प्रचारार्थ नरखेड, ता.मोहोळ येथे जाहीर सभा होणार आहे. 

सोमवारपासून ते मतदानापर्यंत राज्यातील विविध मतदारसंघात सभा घेणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. सिंदखेडराजा, आष्टी येथे त्यांच्या यापूर्वीच अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सभा झाल्या असून, काल गेवराईतील एका सभेला तर त्यांनी चक्क मोबाईलवरून मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment