तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

लेंडेवाडी तांडा (इंदिरा नगर) येथील अनेक युवकांचा भाजपात प्रवेश ; ना. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०६ ----  लेंडेवाडी तांडा (इंदिरा नगर) येथील अनेक युवकांनी ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेत्रत्वावर विश्वास व्यक्त करीत भाजपात प्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी युवकांनी व्यक्त केला. सर्व युवकांचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले.
       परळी विधानसभा मतदार संघातील लेंडेवाडी तांडा (इंदिरा नगर) येथील अविनाश चव्हाण, शिवाजी राठोड, गणेश चव्हाण, रमेश चव्हाण, बाळू चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, कुमार चव्हाण, मोहन चव्हाण, राजेभाऊ राठोड, रावसाहेब चव्हाण, महादेव राठोड, अनिल चव्हाण, भारत चव्हाण, सुरेश चव्हाण, विलास चव्हाण, राजेभाऊ चव्हाण आदी युवकांनी आज यशश्री निवासस्थानी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. 
     या निवडणुकीत ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या युवकांनी दिली.

No comments:

Post a comment