तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

कालरात्री देवी व डोंगरतुकाई देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ


संभ्रमाचा नाश करणारी परळीची कालरात्री देवी 
आरोग्य भवानी डोंगरतुकाई देवी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)   ः- 
नवरात्रउत्सवात शहरातील कालरात्री देवी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची सकाळी व सायंकाळच्या वेळी गर्दी होत आहे. शहरापासुन जवळच असलेल्या डोंगरतुकाई देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागत आहे. नवरात्रउत्सावात हे दोन्ही मंदिर भक्त्त्तांनी फुलले जाते. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कालरात्री देवी मंदिर व डोंगरतुकाई देवी मंदिरास रंगरंगोटी करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
शहराच्या पुर्वेस कालरात्री देवीचे प्राचिन व मोठे मंदिर आहे. प्राणीमांत्राचा मोह, संभ्रम आशा आवस्थांचा नाश करणारी कालरात्री देवी आहे. एकाद्याला जर भ्रम विकार झाला असेल तर त्यांच्या निवारणासाठी या देवीपाशी यथाविधी अनुष्ठान केल्यास त्याचा भ्रम जातो. अशी अख्यायीका आहे. 
दसर्‍याच्या दिवशी वैद्यनाथा बरोबर या देवीची ही पालखी निघते. कालरात्री देवीचे वैशिष्टये म्हणजे देवीच्या मुर्तीच्या मागे वैद्यनाथाची पिंड आहे. दसर्‍याच्या दिवशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा बरोबर बहीणीचे नाते असलेल्या या देवीला वैद्यनाथ कडुन आहेर होतो. देवीला साडी चोळीचा आहेर आणि ओटी भरली जाते. आहेर करण्याचा मान पुर्वी पासुन देशपांडे घराण्याचा आहे. 
हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. तसेच देवीच्या पालखीची मिरवणुक निघते. या मंदिरा पुढील मैदानावर दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी शोभीची दारु उडवली जाते.  सिमोल्ंलघन करुन परतलेली मंडळी सायंकाळी या मंदिर परिसरातील मैदानापुढे जमते व आपट्यांची पाने म्हणजे एकमेकांना सोने देऊन भेटतात व बटुभैरव मंदिरात दोन्ही पालख्या थोड्या वेळ थांबतात तेथून वैद्यनाथ मंदिरात येतात. 
आरोग्य भवानी (डोंगरतुकाई)
शहरापासुन तीन किलो अंतरावर चांदापुर घाटनांदूर मार्गावर निसर्गरम्य परिसरात वनभवानी डोंगरतुकाईचा वास आहे. नारायण पर्वताच्या आग्नेय दिशेस एक कोस अंतरावर गोंधू माळ पर्वतावर डोंगरतुकाई देवीचे स्थान आहे.  वैद्यनाथ या क्षेत्री असल्यामुळे येथे औषधी व वनस्पतींची साठवण आरोग्य भवानीने केली आहे. अनेक ठिकाणाहुन दुर्मिळ वनस्पतीच्या प्राप्तीसाठी जानकर वैद्य येथे येत असतात. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती आपल्या चार शिष्या बरोबर वैद्यनाथ क्षेत्रातील  आरोग्य भवानी पशी चार दिवस राहील्याचा उल्लेख आहे. 
डोंगरतुकाई मंदिराचे वैशिष्टये म्हणजे ते एक जागृत देवस्थान मानले जाते. दगडी बांधकाम असलेले मंदिर फार प्राचीन आहे. परळीकरांच्या दृष्टीने तुळजापुरच्या भवानी देवी ऐवढे महत्व या स्थानाला असल्यामुळे परळीकरांची तुळजाई म्हणून डोंगरतुकाई ओळखले जाते. डोंगरावर असलेल्या मंदिरा पर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. नवरात्र उत्सवात येथे मोठी गर्दी असते. 
कालरात्री मंदिरात व डोंगरतुकाई मंदिरात नवरात्रउतसवात दररोज आरती, भजन हे कार्यक्रम होतात. अनेक भक्त घटी म्हणून बसलेले असतात. 
एसटी महामंडळाच्या वतीने डोंगरतुकाईसाठी बससेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

No comments:

Post a comment