तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 October 2019

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचा मतदानावर बहिष्कार

तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथे पोस्टल मतपत्रिका परत करून मतदानावर बहिष्कार टाकत जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उपसले आहे.
एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना शासनाने जुन्या पेन्शन योजनेपासुन वंचित ठेवल्याने शालेय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत.
या वर्षी जुन महिन्यात शालेय कर्मचा-यांनी बेमुदत उपोषण केले होते.
हे उपोषण सोडवताना शासनाने जुन्या पेन्शन योजनेसाठी समितीची नेमणुक करून या समितीला तिन महिन्याचा कालावधी दिला होता.परंतु या समितीने कुठलेही काम न केल्याने याबाबत शासनाची उदासीनता पाहुन सोनपेठ तालुका जुनी पेन्शन संघर्ष समितीने येथील तहसीलदारांना एक निवेदन देऊन 19 ऑक्टोबर रोजी सामुहिक रित्या पोस्टल मतपत्रिका प्रशासनास परत करून निवडणुक प्रक्रिया ही काळ्या फिती लावुन करणार असल्याचे सांगितले आहे.
या निवेदनावर आर.एस.धबडे, एस.जी.खंदारे, गुलाब कदम, एस.पी. पाटील, ओ.आर.लष्करे, एम.एम.व्हावळे, एम.डी.पवार, डी.आर.देशमुख,पी.एम.पारेकर, पि.व्ही शिंदे, जी.एल कदम, के.एम.काहेद, ए.व्ही.पुजारी, आर.एम.कांगडे, जी.एम.मोदी, एस.एस.गवळे, आर.एम तिवार, एम डी.पवार, डी.एम.पनुरे, एस.एस.तांदळे, बी.बी तिरमले यांच्यासह आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a comment