तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

जनक्रांती सेनेचे बबनभाऊ गित्ते यांच्या पाठिंब्यामुळे धनंजय मुंडे यांचे पारडे जड ; खोडारड्या सरकारला खाली खेचून धनंजय मुंडे यांना विजयी करा- भक्तराम फड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा प. स.स.सदस्य मा.श्री.बबन भाऊ गित्ते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळी मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पारडे जड झाले असुन विरोधकांचे धाबे दणाणले असून खोडारड्या सरकारला खाली खेचून परळीच्या सर्वांगिण विकासासाठी धनंजय मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन युवक नेते भक्तराम फड यांनी केले आहे. दरम्यान बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा विद्यमान आमदारांनी या मतदार संघातील जनतेला खोटी आश्वासने देत घोर फसवणूक केली आहे. धनंजय मुंडे हे  उमेदवार असल्याने येथील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याने या निवडणुकीत परिवर्तन अटळ असा विश्वास भक्तराम फड यांनी व्यक्त केला.

      परळी विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्रींच्या कारभाराला जनता त्रस्त झाली असून त्यांनी मोठी विकासकामे झाली नाहीत तसेच मुलभुत गरज असणारे रस्तेही खड्डेमय झाले आहे. मतदारसंघातील विकास खुंटला आहे. मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आमदार केले. त्या जनतेला खड्डेमय रस्त्यात टाकण्याचे काम पालकमंत्री यांनी केले. मोठी विकासकामे दूर साधे रस्ते सुस्थितीत ठेवू शकत नाही असा आमदार पुन्हा नको असे चित्र मतदारसंघात आहे. त्यामुळे जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. धनंजय मुंडे यांना घरोघर घराघरातून प्रचाराला मोठा मिळणारा प्रतिसाद पाहता. धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास फड यांनी व्यक्त केला.

परळी मतदारसंघातील विकास रखडला हे पालकमंत्री यांचे पाप आहे. केवळ आकड्यांचा खेळ करून त्यांनी जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले. त्यामुळे परळी मतदारसंघातील मतदार त्यांना कंटाळले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे , काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास जनक्रांती सेनेचे युवक नेते भक्तराम फड यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a comment