तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 25 October 2019

आपल्या आठवणीतलं उमदं नेतृत्व गेवराई येथील कै.सुरेशराव देशमुख


 सुभाष
मुळे..
----------------
गेवराई, दि. २६ _ अभ्यासू, कर्तृत्ववान आणि उजळून, तापून निघालेल्या अर्थातच सोन्याला झळाळी आलेलं असं प्रखरतं नेतृत्व म्हणजेच सुरेशराव देशमुख हे होत. त्यांना आपल्यातून जावून आज रोजी तब्बल एक वर्ष उलटले. खरं तर माझ्या लेखनीत एवढं सामर्थ्य नाही की, सुरेशराव देशमुख काकांचा जीवनप्रवास उतरेल.. परंतु केलेला प्रयत्न निश्चितपणे अथांग समाजाला स्फूर्ती व प्रेरणादायी ठरेल हे निश्चित. अशा उदारमतातून आमचे गेवराई येथील पत्रकार सुभाष मुळे यांनी टिपलेले ठराविक शब्द आमच्या वाचकांसाठी अर्पित करत आहोत.
       
एक समर्पण था,
एक अर्पण था !
जीनका जीवन,
एक अनोखा दर्शन था !!

       एक अलौकीक व्यक्तिमत्व आणि आठवणीतलं उमदं नेतृत्व म्हणजेच सुरेशराव देशमुख हे होत. फुलांचा सुगंध हवेत दरवळत होता, सुर्याची किरणं स्वागताला उभी होती अशा विपूूल वातावरणात.. आनंद, स्वच्छंद, यशाचं शिखर गाठणारं, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारं व्यक्तिमत्त्व सुरेशराव देशमुख ९ नोव्हेंबर १९५० रोजी आई 'पार्वती' च्या कुशीत जन्माला आलं. महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा या दुष्काळी विभागातील विशेषतः जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात जन्म घेणारे आणि बीड जिल्ह्याच्या गेवराईत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे सुरेशराव देशमुख यांच बालपण म्हणजे आयुष्यात गवसणी घालणारं ठरलं. आठवीत असताना त्यांचे वडील गेले. तेव्हापासून त्यांची संघर्षाला खरी सुरुवात झाली. ते बालवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असे. शाखेचा गणवेश, गुरुदक्षिणा व इतर खर्चासाठी त्यांनी लायब्ररीत चालक म्हणून काम केले. त्यानंतर बी कॉम चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुस्तकाच्या दुकानात काम केले. दरम्यान आबासाहेब देशपांडे यांनी माननीय बोरगावकर यांच्या श्री इंडस्ट्रीज मध्ये १५० ₹ पगारावर नौकरी मिळवून दिली. अथांग सागरापेेेक्षाही 'उंचावणारंं' या समर्थशाली जगात अतिशय खडतर परिस्थितीत मार्ग काढून देेेशमुख काकांनी प्रयत्नांंची पाराकाष्ठा केली. ऊन सावलीतील बालपण संपवून वयाच्या एकविसाव्या वर्षी श्री. इंडस्ट्रीज औरंगाबाद येथे श्रीमान बोरगावकर यांच्याकडे लिपीक या पदावर केवळ १५० ₹ पगारावर नौकरी सुरू केली. दरम्यान १९७४ रोजी गेवराई येथील ॲड. दिगंबरराव पांडव यांच्या सुकन्या 'शोभाताई' यांच्याशी विवाह झाला. दरम्यान सुरेश काकांनी त्यांचं नाव वैशाली ठेवलं. सुरेशराव देशमुख यांनी औरंगाबाद येथील बोरगावकर यांच्याकडे लिपिक पदाची जवाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. त्या दरम्यान पुणे येथे स्पन पाईप असोसिएशनचे संमेलन होते, याठिकाणी संपूर्ण राज्यातून फक्त असोसिएशनच्या संस्थापकांनाच येण्याची परवानगी होती. माननीय बोरगावकर हे आजारी असल्यामुळे त्यांनी प्रतिनिधी म्हणून सुरेशराव देशमुख यांची नियुक्ती केली होती, परंतु संबंधितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथून निघून जाण्यासाठी सांगितले, भूषणावह बाब अशी की, सुरेशराव देशमुख यांनी स्पन पाईप असोसिएशनचे तब्बल पाच वर्षे अध्यक्ष पदाची धूरा सांभाळली.
         सुरेशराव देशमुख यांचा १९७२ ते १९८२ चा हा कालखंड नौकरीत गेला. या प्रचंड अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला तयार केले. म्हणतात ना की.. सोन्याला ताऊन सुलाखून निघावे लागते, अगदी त्याच प्रमाणे अनेक प्रसंग व अडचणीवर मात करत सोन्याला आलेल्या झळाळी प्रमाणे प्रत्येकवेळी हसतमुखाने सामोरे गेले. पगार अगदी तुटपुंजी असताना देखील कुटुंबाला जाणीव होऊ दिली नाही. कुटुंबाला वेळ देऊन वेळोवेळी लक्ष केंद्रित ठेवले. शोभाताईंशी बोलताना अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले, ... कमी पगारातही बायकोसह घरातल्यांचे देखील तेवढ्याच हौसेने 'लाड' पुरविणारे ते होते. काकांचे कुटुंबाविषयी असलेले वात्सल्य व त्यांच्यातील रसिकता नजरेत भिडली गेली. तासनंतास पायी चालत जाऊन सिनेमा पाहणं ही त्यांतील कला न्यारीच होती. कुटुंबाला वेळ देऊन वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी यशाचं शिखर गाठलं. १९८२ साली गेवराई येथे स्वतःची फॅक्ट्री उघडून नव्या दालनाचा प्रारंभ झाला. बालवयातच राष्ट्रीय कार्याचा वसा घेतलेला असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्य हाती घेऊन पार पाडली. भुकंप व पुरग्रस्तांना मदत करून विविध शिबिरे घेऊन सहभाग देखील नोंदविला. आई वडिलांची ईच्छा ही दिगंबरराव पांडव यांच्या प्रेरणेने १९८४ रोजी हेरंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करून मंदिराची उभारणी केली. त्यावेळेस दुग्धशर्करा योगच जुळून आला असं म्हणता येईल. अक्कलकोट निवासी श्री. गजानन महाराज राजीमवाले यांच्या हस्ते त्यावेळी स्थापना करण्यात आली, आणि प्रगतीचे द्वारे यशाच्या शिखरावर नेऊ लागली. १९९२ साली कंपनीला सर्वप्रथम आय एस आय चे मानंकन व राज्याचे प्रथम पारितोषिक

No comments:

Post a Comment