तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅलीतुन भक्तीच्या शक्तीचे अभूतपूर्व दर्शन ; खा.प्रितमताई मुंडे यांचे ठिकठिकाणी स्वागत
  वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.०८----भगवान भक्तीगड सावरगाव घाट येथे भव्य दसरा मेळाव्या निमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड अशी भक्तीच्या शक्तीचे भव्य दर्शन घडवणारी अभूतपूर्व रॅली पार पडली.सावरगाव येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याला खा.डॉ.प्रितमताई मुंडे परंपरेनुसार भव्य रॅलीद्वारे पोहोचल्या.

सावरगाव घाट येथे राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती.दसरा मेळाव्या निमित्त खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी रॅलीला सुरुवात केली.

याप्रसंगी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे गावोगावी मोठ्या ढोल ताश्यांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.हजारो चारचाकी वाहनांचा सहभागाने रॅलीला भव्य रूप प्राप्त झाल्याने भक्तीच्या शक्तीचे अभूतपूर्व दर्शन घडले.खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीमुळे भगवान भक्तांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता.सावरगाव घाट येथे रॅलीचे आगमन झाल्या नंतर भगव्या पताका घेऊन आलेल्या हजारो भगवान भक्तांनी खा.प्रितमताई मुंडे यांचे “भगवान बाबा की जय” या जयघोषात स्वागत केले.तत्पूर्वी खा.प्रितमताई मुंडे यांचे सिरसाळा, तेलगाव,वडवणी,घाट सावळी,बीड,वंजारवाडी,थेरला फाटा,नायगाव,सौताडा,चंबळी फाटा,कुसळंब येथे स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment