तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

डिग्रस, पोहनेर, कासारवाडीचे मतदार ना. पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी भक्कम! ; विकासालाच विक्रमी मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार , ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला ग्रामस्थांना शब्द, ताई आम्ही तुमच्याच सोबत - नागरिकांनी दिला विश्वास
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- . 10 --------भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी विधान सभेच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी डिग्रस, पोहनेर आणि कासारवाडीच्या मतदारांशी संवाद साधला. आम्ही विकासासाठी तुम्हालाच विक्रमी मताधिक्य देणार असल्याचा शब्द देत डिग्रस, पोहनेर, कासारवाडीचे मतदार ना. पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी भक्कम असल्याचे दाखवून दिले. "तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला विकास देते असा शब्द ना. पंकजाताई मुंडे यांनी  ग्रामस्थांना दिला. गावोगावी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी आपल्या लाडक्या लेकीचे औक्षण केले.
     ना. पंकजाताई मुंडे यांनी बुधवारी सायंकाळी डिग्रस येथे जाऊन प्रथम देवीचे दर्शन घेतले आणि नागरीकांशी थेट संवाद साधला. कोणतातीही औपचारिकता न करता गावच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. "तुमच्यामुळे गावागावात चांगले रस्ते झाले, गोरगरीबांना घरे मिळाली असे सांगून आपण दिलेल्या निधीमुळे परिसरात विकास गंगा आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनीही पुढे येऊन ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी संवाद साधला. बचत गटामुळे आम्हाला आर्थिक पाठबळ मिळाले आगामी काळात आम्हाला जास्त काम करायचे आहे तुम्ही सहकार्य करा अशी विनंती महिलांनी केली. तरूण - तरूणींही संवाद साधुन आपल्या अडचणी सांगितल्या.   
      ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मी विकासासाठी बांधिल आहे. या भागात चांगले रस्ते करून शेतीसाठी सिंचन व्यवस्था करण्याकडे माझे विशेष लक्ष आहे. बळीराजा सुजलाम सुफलाम झाला तर भागाला वैभव प्राप्त होते. म्हणून मी शेती व्यवसाय गतीमान करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांसाठी बचत गट आणखी सक्षम करणार असुन कर्ज मर्यादाही वाढविणार आहे. गटांची संख्या वाढवून जास्तीत जास्त महिलांना या चळवळीत सहभागी करून घेण्यावर भर देणार आहे असा शब्द महिलांना दिला. पिण्याच्या पाण्यासाठी प्रभावी योजना राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      तरूण - तरूणींना उच्च शिक्षणासाठी सर्व सहकार्य करणार असुन आपल्या भागातील युवक मोठ्या संख्येने प्रशासनात जावेत ही आपली इच्छा आहे. तरूणांनी यासाठी पुढे यावे मी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली. ना. पंकजाताई मुंडे यांनी डिग्रस, पोहनेर, रामवाडी, कासारवाडी या गावांना भेटी दिल्या. कुठेही भाषण न करता महिला - नागरीकांशी संवाद साधला. मुक्तपणे गप्पा मारून सर्वांच्या भावना आणि भूमिका समजावून घेतली. या भागाला विकासातुन नवे रूप द्यायचे आहे. त्यामुळे कुणाच्याही भुल - थापांना आणि जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता तुम्ही मला साथ, भरभरून आशिर्वाद द्या मी विकासात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
     यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सलीम जहांगीर, वृक्षराज निर्मळ, सुधाकर पौळ, मुरली साळवे,

महिलांमध्ये प्रचंड उत्साह!

ना. पंकजाताई मुंडे यांच्या या दौऱ्यात महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी महिलांनी ना. पंकजाताई यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रांगोळी काढून आणि औक्षण करून ना. पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. रात्र असुनही महिला व मुली ना. पंकजाताई यांना भेटून बोलण्यासाठी थांबल्या होत्या. महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

No comments:

Post a comment