तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 October 2019

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द- धनंजय मुंडे ज्येष्ठांचा मान, प्रतिष्ठा व सन्मान करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द- धनंजय मुंडे
ज्येष्ठांचा मान, प्रतिष्ठा व सन्मान करणारा राष्ट्रवादी काँग्रेसपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.01.......राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा.श्री.शरदचंद्रजी पवार हे देशात 81 वर्षांचे ज्येष्ठ आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे मी उभा आहे. परळी मतदारसंघाच्या विकासासाठी व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक सेल व ईपीएस पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने स्व.गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंगमंदिर येथे आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.

परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी व त्यात कुणी अडचण आणु नये त्यासाठी मी उभा आहे. ज्येष्ठांनी आशीर्वादरूपी मतदान करून विजयी करण्याचे आवाहन श्री.मुंडे यांनी बोलताना केले.

या कार्यक्रमात डॉ.संतोष मुंडे यांनी 70 ज्येष्ठ नागरिकांच्या बी.पी., शुगरच्या तपासण्या करून औषध दिले.

मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, राजेंद्र सोनी उपस्थित होते. यावेळी अनंत इंगळे, ज्येष्ठ नागरिक सेलचे कार्याध्यक्ष अशोक शेप, श्रीहरी कवडेकर, मुकिंदा जगतकर, हरिभाऊ मस्के, श्री.मरोळे यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.डी.उपाडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ पवार, आश्रुबा चव्हाण, संतराम गित्ते, अरूण जोशी, पंढरी गायकांबळे, चंद्रकांत खके, अशोक भोसले, प्रभाकर कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, वैजनाथ सावजी, डी.एम.जायभाये, उध्दव मुंडे, एम.टी.मस्के, अरविंद कुरकु, श्रावण जगतकर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment