तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

होंडा अॅक्टिवा जिंकत स्वप्नजा चाटे ठरल्या परळीच्या गृहिणी नंबर वन टि पी एस कॉलनी विभागाने दुसऱ्या वर्षी मारली बाजी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
संस्कार प्राथमिक शाळा प्रायोजीत, लखन परळीकर आयोजित खेळ पैठणीचा गृहिणी नंबर वन हा कार्यक्रम परळीकर महिलांसाठी एक पर्वणी ठरलेला आहे. दर वर्षी नवरात्रोत्सवा निमित्ताने होणाऱ्या या विशेष स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहिली जाते. 
खेळ पैठणीचा 2019 च्या  गणेशपार विभागातून सौ. पार्वती साखरे या विभागीय विजेत्या ठरल्या, पद्मावती विभागातून सौ. सविता माळचिमणे कदम,कृष्णानगर विभागातून सौ.श्यामल गित्ते,विद्यानगर विभागातून सौ.डॉ छाया मुंडे, शंकर पार्वती नगर विभागातून सौ. सिंधू मस्के,शक्तीकुंज वसाहत विभागातून सौ. स्वप्नजा चाटे,वाईल्ड कार्ड इंट्री सौ.लाहोटी यांनी मिळवली 
आणि या सात विभागीय विजेत्यांमध्ये महाअंतिम फेरी सोमवार दिनांक 7 आँक्टोबर  2019 रोजी भव्य दिव्य स्वरूपात जल्लोषात संपन्न झाली.  
त्यात टि पी एस काँलणी विभागाच्या सौ.स्वप्नजा चाटे यांनी आपले कौशल्य पणाला लावत ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकून संस्कार शाळेकडून बक्षीस स्वरूपात ठेवण्यात आलेली होंडा अॅक्टिवा जिंकत मानाची पैठणी पण मिळवली. त्यांनी विजय संपादन करत खेळ पैठणीचा गृहिणी नंबर वन ही  स्पर्धा जिंकली.

---------------------
चौकट
परळीतील महिलांचे आकर्षण ठरलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमा मध्ये सहभागी गृहिणींचे व आयोजकांचे सौ.राजश्री वहिनींनी कौतुक करत सर्वांना पुढील
कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 ............................

क्षणचित्र                  
 मुंबई पुण्याच्या दर्जाचे,भव्य दिव्य स्टेज  
 पुण्याची स्पेशल महिला बाऊन्सर टीम व  रेबन गाँगल ,पुना गाडगीळ व मर्सडीज बेंझ अशावधव नामांकित 250 कंपनीची ब्रँड आंबेसिडर मॉडेल क्रिस एलिनोर आकर्षण ठरली 
पद्मावती गल्ली मारोती मंदिर जवळ महिलांनी खचाखच भरलेले पहावयास मिळाले 
कार्यक्रमातील टापटीपपणा नजरेत भरत होता 
परळी शहरात एक स्टेप व ट्रेस वापरलेले  भव्य दिव्य स्टेज पहिल्यांदाच पहावयास मिळाले  
सर्व आयोजक  प्रायोजकांनी विजेतीस वर्षभराच्या खरेदीवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केला

No comments:

Post a Comment