तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

परळीत कसली असुरक्षितता? ... तर इतक्या महिला आल्या असत्या का ? धनंजय मुंडे हे तर परळीतल्या भगिनींचे भाऊ- सौ.राजश्रीताई मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि 11..... परळीत कसली आली आहे असुरक्षितता ? उलट धनंजय मुंडे या तुमच्या भावाचे सुरक्षाकवच असल्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने महिला मेळाव्याला येवू शकतात, अशा शब्दात सौ.राजश्रीताई मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांच्या परळीतील दहशतीच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. 1500 गरीब भगिनींचे विवाह करणार्‍या या भावाच्या पाठीशी भगिनींचे आशीर्वाद आहेत म्हणूनच त्यांच्यात राज्यात शिवस्वराज्य आणण्याची धमक आहे, त्यांना ते काम करू द्या, तुमच्या लेकाला, तुमच्या भावाला विजयी करण्याची जबाबदारी आपण सर्व मिळून हाती घेवूया असे आवाहन करताच, उपस्थित महिलांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत भावाच्या विजयाची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

निमित्त होते ते परळीत झालेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ हालगे गार्डन मधील महिला मेळाव्याचे. राजकारणात नवख्या असल्या तरी विरोधकांच्या आरोपांनाही सडेतोड उत्तर देण्याची धमक आपल्यात असल्याचे राजश्रीताई मुंडे यांनी दाखवून देत आज तमाम परळीतील महिलांची मने जिंकुन घेत आपली एक नवीनच ओळख करून दिली.

परळीत भिषण पाणी टंचाई होती, त्याचा सामना आम्हा माता-भगिनींना करावा लागला, त्यावेळी आमदार, खासदार कोठे होत्या ? धनंजय मुंडे यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला का नाही ? असा प्रश्न करताच असे महिलांनी हो-हो असे म्हणत जोरदार प्रतिसाद दिला.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 50 हजारांचे अर्थसहाय्य बचत गटांना मिळवून देवू व लघु उद्योगांना प्रोत्साहन देवु, कौशल्य प्रशिक्षणासाठी वेळोवेळी शिबीरे आयोजित करून, बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देवू असेही सौ.राजश्रीताई मुंडे म्हणाल्या.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, प्रदेश उपाध्यक्षा कमलबाई निंबाळकर, माजी जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई फड, पं.स.सभापती कल्पनाताई सोळंके, पाणी पुरवठा सभापती प्राजक्ताताई कराड, काँग्रेसच्या नेत्या यमुनाताई बुकतर, वैशालीताई तिडके उपस्थित होत्या. यावेळी अनुसयाताई ताटे, सिमाताई जोगदंड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पल्लवी भोयटे यांनी, प्रास्ताविक सौ.अर्चनाताई रोडे यांनी केले तर आभार सौ.सुवर्णाताई टिंबे यांनी मानले. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस अन्नपुर्णाताई जाधव, शहराध्यक्षा अर्चनाताई रोडे, युवती शहराध्यक्षा पल्लवीताई भोयटे, तालुकाध्यक्षा सुलभाताई साळवे, महिला व बालकल्याण सभापती राजश्रीताई देशमुख, नगरसेविका पठाण नाजेमा बेगम,अन्नपुर्णाताई आडेपवार, उर्मिलाताई मुंडे, शोभाताई चाटे, रेश्माताई बळवंत, रेखाबाई आघाव, गोदावरीताई पोखरकर, संगिताताई धुमाळ, बेबी खाला, कौसरबाजी इनामदार, मुन्नीबाजी, वाघमारे ताई, रूक्मीणबाई धोत्रे, सुनंदाताई साळवे, चंद्रकला जगतकर, सुवर्णा रेवले आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या, बचत गटांच्या पदाधिकारी यांसह मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होत्या.

आई तु बाबांना साथ दे

धनंजय मुंडे 24 तास जनतेसाठी राबत असतात, मला माझ्या मुली म्हणाल्या आई बाबा 24 तास नागरिकांमध्ये असतात, त्यांच्यासाठी काम करतात, तु ही एक पाऊल पुढे टाकत महिलांसाठी काम कर असे सांगितल्यामुळे मी आज त्यांना सहाय्य करण्यासाठी तुमच्यात राहून तुमच्यासाठी काम करण्यासाठी पुढे आली आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी येत आहेत, मात्र त्यांच्या पाठीशी हजारो भगिनींची शक्ती असल्याने त्यांचा पराभव कोणी करू शकणार नाही, असा विश्वास सौ.राजश्रीताई मुंडे यांनी व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment