तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ आज परळीत महिला मेळावा सौ.राजश्रीताई मुंडे, कमलताई निंबाळकर, नगराध्यक्षा हालगे, रेखाताई फड करणार मार्गदर्शन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- दि.10.............. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ1 ऑक्टोबर रोजी परळी शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास सौ.राजश्रीताई मुंडे ह्या मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 02 वाजता हालगे गार्डन येथे होणार्‍या या मेळाव्यास नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, जिल्हाध्यक्षा सौ.संगिताताई तुपसागर, प्रदेश उपाध्यक्षा कमलताई निंबाळकर, प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई फड, माजी उपनगराध्यक्षा निलाबाई रोडे, पं.स.सभापती कल्पनाताई सोळंके, जिल्हा सरचिटणीस अन्नपुर्णाताई जाधव, चित्राताई देशपांडे, शहराध्यक्षा अर्चनाताई रोडे, युवती शहराध्यक्षा पल्लवीताई भोयटे, तालुकाध्यक्षा सुलभाताई साळवे, पाणी पुरवठा सभापती प्राजक्ताताई कराड, बांधकाम सभापती प्रियंकाताई रोडे, महिला व बालकल्याण सभापती राजश्रीताई देशमुख, उपसभापती कमलबाई कुकर, नगरसेविका पठाण नाजेमा बेगम, अमृता सचिन रोडे, अन्नपुर्णाताई आडेपवार, उर्मिलाताई मुंडे, शोभाताई चाटे, रेश्माताई बळवंत, शहाजहा बेगम पठाण, रियानाबी शेख, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष नादान बाजी, जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई किरवले, रेखाबाई आघाव, कौसाबाई फड, आशाताई दौंड, सुषमाताई मुंडे, गित्ते ताई, गोदावरीताई पोखरकर, संगिताताई धुमाळ, बेबी खाला, कौसरबाजी इनामदार, मुन्नीबाजी, वाघमारे ताई, माजी नगरसेविका दैवशालाबाई नानवटे, रूक्मीणबाई धोत्रे, संगिताताई रूपनर, राधाताई फकीरे, वैशालीताई तिडके, आशाताई घाडगे, सुनंदाताई साळवे, चंद्रकला जगतकर, सुवर्णा रेवले, अश्विनी खेत्रे आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

या मेळाव्यास शहरातील व मतदारसंघातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रचार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment