तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांचा वाढदिवस उत्साहात साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ज्येष्ठ पत्रकार तथा परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
             परळी शहरातील ज्येष्ठ संपादक भगीरथ बद्दर यांचा वाढदिवस परळी शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दै.मराठवाडा साथी कार्यालयात संपादक सतिश बियाणी यांनी शाल, पुष्पहार पेढे, भेट वस्तू देऊन वाढदिवस निमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, मारवाडी युवा मंचचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी, स्विकृत नगरसेवक बाळू लाड्डा, प्रशांत जोशी धनंजय अरबुणे, दत्ता काळे, ओमप्रकाश बुरांडे, अजय पुजारी व इतर उपस्थित होते. दै.जगमित्र कार्यालयात संपादक बालासाहेब कडबाणे यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे उपजिल्हा रुग्णालय जवळील दत्ता कम्युनिकेशन येथे संपादक बद्दर यांचा पत्रकार मोहनराव वाव्हळे, धनंजय आढाव, धिरज जंगले, संभाजी मुंडे, दत्ता मामा, महादेव गित्ते, विकास वाघमारे आदी पत्रकार बाधंव उपस्थित होते. तसेच सायं.दैनिक परळी बुलेटिनच्या कार्यालयात संपादक भगीरथ बद्दर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार संपादक रानबा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम, महादेव गित्ते, विकास वाघमारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संपादक बालकिशन सोनी, प्रा.विशाल पौळ, जयदत्त नरवटे, ज्ञानेश्वर होळंबे, उपस्थित होते. संपादक भगीरथ बद्दर यांना आज दिवस भरातून शुभेच्छांचा स्वीकार केला. मोबाईल, व्हॉटस्‌ऍप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला. 
      परळी पोलखोलचे संपादक भगीरथ बद्दर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बद्दर  यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे भगीरथ बद्दर यांनी आभार मानले असुन या शुभेच्छांच्या बळावर आपण कटीबध्द राहुन आणखी उमेदिने सामाजिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment