तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 28 October 2019

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या-लहुदास तांदळे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   तालुक्यातील सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या सोयाबीन ,हायब्रिड, बाजरी, पिवळा, वेचणीस आलेल्या कापसाचे व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत घावी अशी मागणी परळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लहुदास तांदळे यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे. 

    तालुक्यातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या हातात आलेली सुगी वाया  गेली आहे. या पावसाने झालेल्या नुकसानी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानभरपाईचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सुचना प्रशासनाने तहसीलदार व कृषी अधिकारी यांना तात्काळ  द्यावी अशी मागणी तांदळे यांनी केली आहे. तालुक्यातील मध्ये मोठ्यात् प्रमाणात  सोयाबीनची व कापसाची लागवड झाली होती. अल्प प्रमाणात सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. 
अनेक शेतांमध्ये पिकांचे ढिग केलेले सोयाबीन भिजत आहे. काहींनी पिकाच्या सुड्या रचून त्यावर प्लॅस्टिक अंथरत पीक वाचविण्याची धडपड सुरू केली. जूनमध्ये लागवड झालेल्या कापूस क्षेत्रात वेचणी सुरू झाली होती. वेचणीला आलेला कापूस झाडावर ओला झाला. ज्वारीची सोंगणीसुद्धा सुरू झालेली असून अनेकांचे हे पीक सध्या पाण्यात तरंगत आहे. सोयाबिचे असे नुकसान झाले की कोंब बाहेर येण्यासारखी दुर्दैवी परिस्थिती तयार झालेली आहे. तुर पिक सतत पडनार्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होउन उधळुन जात आहेत. तसेच दिवाळीच्या पर्वात रब्बी लागवडीची लगबग सुरू झालेली असते. यंदा मात्र सलग पावसामुळे शेत तयार करण्यास वाफसा मिळालेला नाही. सलग पावसाळी वातावरणामुळे शेत तयार करण्याचे काम लांबणीवर पडत आहे. खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी लागवडीसाठी पुन्हा पैशांची निकड भासत आहे. नैसर्गिक संकटामुळे वारंवार शेतकरी आर्थिक समस्याला तोंड देत आहे. या वर्षी सुरवातीला पावसाने उगाड दिली होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेला घास पळविला आहे शेतकऱ्याला या आर्थिक विवेचनेतून बाहेर काढण्या साठी शासनाने तात्काळ नुकसान  भरपाई द्यावी अशी मागणी परळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लहुदास तांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.

No comments:

Post a comment