तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 October 2019

अल्पसंख्यांक भागातील विकास कामे अडवण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले- धनंजय मुंडेपरळीत अद्ययावत फ्रुट मार्केट, शादीखाना उभारणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.01...... रस्ते, वीज, नाल्या, पाणी या मुलभूत सुविधांची आवश्यकता अल्पसंख्यांक भागात अधिक आहे. या भागात जास्तीत-जास्त विकास कामे करण्यालाच नेहमी मी प्राधान्य दिले आहे. मात्र अल्पसंख्यांक भागातील अनेक विकास कामे अडवण्याचे काम भाजपच्या पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शहराच्या बरकतनगर भागात अल्पसंख्यांक समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींसाठी आपण वसतिगृह बांधले, कब्रस्तानचा प्रश्न सोडवला. फळे विक्रेत्यांसाठी फ्रुट मार्केट, परळीतच नव्हे तर मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहूल गावात शादीखाना व इतर सुविधा देण्याचे वचन आपण वचननाम्यात दिले आहे. आगामी 6 महिन्यात या भागातील सर्व किरकोळ कामे तर पूर्ण होणारच आहेत, मात्र मजुरी आणि लहान-मोठे व्यवसाय करणारा अल्पसंख्यांक समाज विकासाच्या प्रक्रियेत यावा, त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे आपले स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी आशीर्वाद द्या, तुमच्या प्रत्येक अडी-अडचणीच्या सोडवणूकीसाठी मी सदैव तत्पर राहिल, असा शब्द त्यांनी दिला.

अल्पसंख्यांक समाजातील डमी उमेदवार उभे करून मतांचे विभाजन करण्याचा भाजपाचा डाव आहे. मुस्लिम आरक्षणासाठी मी लढा दिला मात्र भाजपाने हे आरक्षण दिले नाही. देशातील एकंदर परिस्थिती पाहता अल्पसंख्यांक समाजाला एकजूटीने राहून आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपाचा डाव ओळखून एकमताने आपली शक्ती माझ्या पाठीशी उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना अडचणी सांगितल्या, त्या सर्वांचे निराकरण धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून केले. या कार्यक्रमास आमीर सहाब, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, नगरसेवक जाबेरखान पठाण, राजाखॉ पठाण, अन्वर मिस्कीन, शकील कुरेशी, सय्यद सिराज, अजीज कच्छी, हाजी बाबा, इम्रान सर, शरीफभाई, सिराज अहमद, अकबर काकर, अलताफ पठाण, गफार काकर, सय्यद फिरोज, नासेर सेठ, तहसीन नवाब, शकील कच्छी, सय्यद मुश्ताक, रफीक पटेल, जब्बार सर, मोईन फारूखी, आमेर खान, शेख हसन, शेख खदीर, जावेद कुरेशी, शेख राजु, अब्दुल गफार काकर सर, परवेज खतीब, इम्रान सय्यद जब्बार, सय्यद शाहीद, शेख नसीर, अजमत खान, सय्यद मुसादिक, शेख लायक यांच्यासह समाजातील गणमान्य व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a comment