तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

महायुतीचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा प्रचारार्थ अभिनेते शक्तीकपूर, आफताब शिवदासानी, अमिषा पटेल. रितीका श्रोत्री, राजेश्वरी खरात गंगाखेडात शहरात येणार


रुणा शर्मा


भाजपा, रिपाई सयत शेतकरी संघटना, शिवसंग्राम, शिवा संघटना, रासपा महायुतीचे उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेते शक्तीकपूर, आफताब  शिवदासानी, रितीका श्रोत्री, राजेश्वरी खरात, अभिनेत्री अमिषा पटेल, रासपाचे अध्यक्ष ना. महादेव जानगर यांचे दि.19 ऑक्टोबर शनिवारी रोजी भव्य रॅली सहसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाखेड मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी प्रचारात महाआघाडी घेतली आसून या प्रचारा दरम्यान मतदारांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे भाजपातील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या प्रचारात उडी घेतली आहे तर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस सह संचालक मंडळानी पाठीबा दिल्याने यांचा मोठा फटका शिवसेनेला बसत आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सह अनेक पदाधिकारी यांनी डॉ.गुट्टे यांना पाठीबा देत प्रचारात उडी घेतली आहे ऊस उत्पादक शेतकरी मतदारांचा प्रतिसाद मिळत अासल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.  भव्य रॅलीचे आयोजन सकाळी 12 ते 2 दरम्यान हाेत आसून रामसिता सदन येथून निघणारी रॅली मुख्य रस्ता डॉ.आंबेडकर चौक पोलीस स्टेशन मार्गे नवी भाजी मंडई, हेडगेवार चौक, श्रीराम चौक मार्गे रघवीर जिनीग मैदानात होणाऱ्या सभेच्या ठिकाणी जाणार आसून या सभेत रासपाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर, शिवा संघटनेचे प्रा.मनोहर र्धोडे, बाजार समिती सभापती बालासाहेब निरस, रासपा युवा प्रदेश अध्यक्ष राजेभाऊ फड, महासचीव बाबासाहेब दौडतळे जि.प.सदस्य राजेश फड, किशनराव भोसले आदी मार्गदर्शन करणार आसून या भव्य रॅली सभेस गंगाखेड विधानसभा मतदारानी उपस्थित राहाण्याचे आव्हान हनुमंत लटपटे, नंदकुमार पटेल, राम लटके, अॅड.संदीप अळनुरे, मगर पोले, सुनिल भाऊ मुडे, नगर सेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, ताहेर पठाण या सह रासपा पदाधिकारी गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment