तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी भव्य दिव्य रॅलीस व ऐतिहासिक दसरा मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थितीत रहावे-संजय मुंडे

व घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ग्रामविकास मंत्री
ना.पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
भक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव येथील भगवानगड येथे भव्य दिव्य दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्यास देशाचे गृहमंत्री अमितजी शाह लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री , सर्व मंत्री , खासदार , आमदार ,प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहे. खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी भव्य दिव्य रॅली निघणार असून ऐतिहासिक दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते संजय मुंडे यांनी केले आहे.

      दसरा मेळाव्या निमित्त दरवर्षीच्या परंपरेनुसार गोपीनाथगड ते भगवानभक्ती गड अशी भव्य दिव्य रॅली खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणार असून गोपीनाथगड येथून सकाळी ०६.३० मिनिटांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे.दसरा मेळाव्या निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर सावरगाव घाट येथे उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक दसरा मेळाव्या निमित्त निघणाऱ्या अभूतपूर्व रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक आपली चारचाकी वाहने घेऊन सहभागी होणार असून आपली परंपरा आपली प्रथा भक्तीच्या शक्तीची यशोगाथा व्यक्त करणाऱ्या अभूतपूर्व रॅलीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणारी रॅली गोपीनाथ गड,सिरसाळा,तेलगाव, वडवणी,बीड, वंजारवाडी, नायगाव,चुंबळी फाटा,वांजरा फाटा,कुसळंब मार्गे भगवान भक्तीगड सावरगाव घाट अशी निघणार आहे.  परळी तालुक्यातील नागरिकांनी भव्य दिव्य रॅलीस व ऐतिहासिक दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते संजय मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment