तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

परळीत घड्याळाला इंजिनची साथ!सुकर झाली विधानसभेची वाट ! ; घड्याळाच्या प्रचारासाठी मनसे मैदानातपरळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पांठीबा दिला असुन तसे जाहिर पाठीब्यांचे पत्र मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस,जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहिवाळ,तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर व अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी दिले असुन या जाहिर पाठीब्यांने घड्याळाची वाट मनसेेने सुकर केली अशी चर्चा परळी मतदारसंघात होत आहे. तर मनसेने घड्याळाच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. 

      परळी मतदारसंघात यापुर्वी 2009ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने तटस्थ भुमिका घेतली होती तर 2014ला मनसेने आपला उमेदवार उभा केला होता .
आता महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केले असुन मतदारसंघाची स्थितीचे अवलोकन करून काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना
पांठीबा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसने,काँग्रेस आघाडीने अनेक मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला पांठीबा दिला असुन प्रचार करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्याचां , लावरे तो व्हिडिओ, म्हणत चांगलाच समाचार घेतला होता त्याचा वचपा , इडीची चौकशी, करून  राज ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारने करून घेतला होता. तो राग, ती चीड,महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्त्याच्यां मनात घर करून होती  ती ला मतदान रूपाने मोकळे करण्यासाठी राज ठाकरे यांनी या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या मुळे मनसैनिकानां वाट मिळाली आहे. परळी मतदारसंघात मनसेचे असख्यं कार्यकर्ते असुन काही कार्यकर्ते पुणे,पिंपरी, चिंचवड तर काही जण  औरगांबाद जिल्ह्यात पोट्यापाण्यासाठी गेलेले आहेत तर तेथेही नौकरकपातीमुळे
त्यांचा रोजगार गेला असुन हे तरूण या युतीसरकावर नाराज आहेत हे बाहेर गावचे मनसैनिक सुद्या परळीत मतदानांला येणार असुन किमान 10ते12हजारा पर्यंत मनसेचे मतदान घड्याळाला पडणार असे परळी मनसेचे पदाधिकारी आत्मविश्वासाने सांगत असुन मनसेचे इंजिन नक्कीच घड्याळ्याची विजयी वाट सुकर करण्यास कारणीभुत ठरणार अशी मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहे.

No comments:

Post a comment