तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 October 2019

तळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा विमुक्त जातीचे उपाध्यक्ष बबनदादा मुंडे, गोविंद मुंडे, देवानंद घुगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान नाना मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी शामराव (दादा)  मुंडे, वाल्मीक मुंडे, वैजनाथ मुंडे, किरण घुगे, अंकुश वायबसे, संतोष मुंडे, नरसिंग मुंडे, बाळू मुंडे, अरूण गायकवाड, विजय घुगे, पंकज उगलमुगले पंडीत वायबसे, ऋषिकेश घुगे, नामदेव घुगे, शिवाजी घुगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भाजपा नेतृत्व कार्यकर्त्यांना अपमानित करणे, कार्यकर्त्यांचा एखाद्या कामाबद्दल फोन न लावणे, उचलणे मी भरपूर निधी आणलेला आहे, जनता माझ्या पाठीशी आहे, माझे कार्यकर्त्यांवाचून काही अडत नाही, अशा अर्विभावात वागतात. मतदार संघात वेळ न देणे, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, मी फक्त सार्वजनिक कामच करील व्यक्तीशः कुणाचे काम करणार नाही, किंवा व्यक्तिगत कुणाचे काम करणार नाही, कुणाचा फोन लावणार नाही, अशा भाषेत कार्यकर्ता व सामान्य माणसांना बोलतात या व अशा अनेक बाबींना कंटाळून तळेगावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी सभापती नारायण पारवे, संतराम मुंडे, माजी चेअरमन महारूद्र मुंडे, व्हाईस चेअरमन बालासाहेब मुंडे, रामधन मुंडे, सुर्यभान मारोती मुंडे, सरपंच सुभाष मुंडे (बंडु), गोविंद गुट्टे, विष्णु पारवे, ग्रा.पं.सदस्य धोंडीराम पारवे आदी उपस्थित होते.

नागपिंपरी येथील कार्यकर्त्यांचाही प्रवेश
दरम्यान नागपिंपरी येथील महादेव कोल्हापुरे, राजेश कोल्हापूरे, मुरलीधर कोल्हापूरे, श्रीमंत कोल्हापूरे, आश्रोबा कोल्हापूरे, बाळासाहेब कोल्हापूरे, दिनकर राठोड, सुरेश राठोड, नागनाथ राठोड, दिगांबर राठोड, सुभाष नामदेव राठोड, सुभाष सुंदर राठोड , ज्ञानोबा राठोड, सुधाकर राठोड, वैजनाथ राठोड, विकास राठोड, प्रकाश राठोड, विजय राठोड, पंडीत राठोड या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

No comments:

Post a comment