तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

तडीपाराने केली पोलीस शिपायाला मारहाण!सरकारी कामात अडथळा प्रकरणी तीन लोकांवर गुन्हा दाखल.
डोणगांव १७
डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व नेहमी चर्चेत असणाऱ्या ग्राम इसवी येथे १६ अक्टोबरच्या संध्याकाळी ६ वाजता दरम्यान डोणगांव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मी तपासा साठी विषवि येथे गेले असता गावातील दिलीप नुरा राठोड वय ३२ वर्ष व त्याच्या दोन साथीदारानि पोलिसांना मारहाण करत शासकिय कामात अडथळा आणण्याची घटना १६ अक्टोबर रोजी घडली
  डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम विश्वी येथील गुन्ह्याच्या तपासात दोन पोलीस कर्मी गेले असता दिलीप नुरा राठोड वय ३२ वर्ष याने व त्याच्या दोन साथीदारांनी पोलिस शिपाई राजेश हरिशचंद्र जाधव याला अडवून मागील तडीपारीचा वचपा काढण्यासाठी व पुढील अवैध धंद्यावर नजर ठेवू नये बिनदिक्कत अवैध धंदे करुद्यावे म्हणून पोलीस प्रशासनावर धाक जमवण्याचा उद्देशाने विश्वी येथील एक वर्षासाठी तडीपार केलेला व तडीपारी कापून परत आलेला दिलीप नुरा राठोड वय ३२ वर्ष व त्यांच्या दोन साथीदारांनी पोलीस शिपायास मारहाण करून पोलीसांच्या तपास कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी पो का राजेश जाधव यांनी फिर्याद नोंदवली असता दिलीप राठोड व त्याच्या दोन साथीदारा विरुद्ध कलम ३५३,३२२,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा नोंदविला आरोपी फरार आहेत तपास पो उ नि शिवाजी राठोड करीत आहेत.

No comments:

Post a comment