तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

राष्ट्रवादीला दे धक्का! माजी नगरसेवक किशोर केंद्रे समर्थकांसह भाजपात ; ना. पंकजाताई मुंडे यांना देणार मताधिक्य!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      राष्ट्रवादी काँग्रेसला आज आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि युवक नेते किशोर केंद्रे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश करून भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. 
      शहराच्या पदमावती गल्ली मधील माजी नगरसेवक आणि धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे किशोर केंद्रे यांनी प्रा. टी.पी. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केंद्रे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत ना. पंकजाताई मुंडे यांना शहरातुन मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. 
         अक्षता मंगल कार्यालयात झालेल्या या प्रवेश कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे, युवानेते निळकंठ चाटे, रामराव गित्ते आदींसह अनेक नेते, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment