तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 October 2019

गोदाकाठचे नागरीक मतदान न करण्यावर ठाम;गावोगावच्या बैठकातील निर्णया नंतर तहसीलदारांना पत्र
प्रतिनिधी
सोनपेठ:-तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी मतदान न करण्याचा व गावबंदीचा निर्णय तहसीलदार यांना एक पत्र देऊन कळवला आहे .
सोनपेठ तालुका जगभर खराब रस्त्यासाठी प्रसिद्ध होता .नागरीकांनी तब्बल ५९ दिवस केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यातील परळीशी जोडणारे दोन रस्ते दुरुस्त झाले तरी पाथरी ,गंगाखेड व परभणी शी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांची अवस्था खराबच आहे .
तालुक्यातील गोदाकाठाला तर रस्ताच नसल्याने तेथील नागरीक नरकमय जीवन जगत आहेत.येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न पुन्हा पेटला आहे .नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदाकाठच्या  लासीना ,थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी,गोळेगाव,लोहीग्राम या सात गावांचा संपर्क आठ दिवस तुटला होता .या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गोदाकाठच्या सात गावांनी थडी उक्कडगाव येथे नुकतीच एक महापंचायत आयोजित केली होती .या वेळी पंचक्रोशीतील नागरीकांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार व अधिकारी व पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला होता .या निर्णयाला समर्थन मिळवण्यासाठी तरुण युवकांनी गावोगाव बैठका घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मतदान न करण्याच्या निर्णयावर गावकऱ्यांचे समर्थन मिळवले .दि ३० सोमवार रोजी गोदाकाठच्या सात गावातील नागरीकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सोनपेठ तहसीलदारांमार्फत पाथरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणूकीत मतदान करत नसल्याचे तसेच अधिकारी व पुढाऱ्यांना गाव बंदीचे पत्र दिले आहे या पत्रात निवडणूकांच्या संबधाने गावात कोणी येऊ नये व आल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास संबधित जबाबदार असतील असेही त्या पत्रात लिहीले आहे.
हे पत्र देण्यासाठी मोठ्या संख्येने गोदाकाठचे नागरीक तरुण मंडळी उपस्थित होते.
फोटो :- गोदाकाठच्या रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार व गावबंदीचे पत्र तहसीलदार यांना देतांना नागरीक

No comments:

Post a comment