तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

केज विधानसभा मतदारसंघात पक्षविरोधी काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांची हकालपट्टी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची माहितीअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तसेच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना मानणारा खुप मोठा वर्ग आहे. तसेच तळागाळापर्यंत पक्ष पोहचलेला आहे.अशा परिस्थितीमध्ये पक्षाच्या विरोधात काम करणा-या केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिका-यांवर तडकाफडकी हकालपट्टीची कार्यवाही जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकारी यांनी पक्ष विरोधी कार्यवाही केल्यावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीत नवनिर्वाचित पदाधिका-यांची नियुक्ती
करण्यात आली होती.परंतु, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी करण्यासाठी त्यांनी पक्ष  विरोधात काम केले होते.त्यात केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद इंगळे, शहराध्यक्ष अतुल इंगळे, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष शेख रहीम,शहराध्यक्ष संतोष लोमटे यांची जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करणारे पञक बुधवार,दि.16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीस दिले आहे.

No comments:

Post a comment