तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

जगाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही - शैलेंद्र पोटभरेमोहा येथे धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या थाटामाटात साजरा  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धम्मचक्र परिवर्तन दिन मोहा ह्या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी तथागत भगवान गौतम बौद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भीमनगर येथे ठीक ९.५५ ला आरपीआय एकतावादीचे जिल्हाध्यक्ष मा.शैलेंद्र पोटभरे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी बौद्ध समाजातील महिला व बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बौद्ध धम्माचा जयघोष करत आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. 
        या कार्यक्रमात आपले विचार मांडत असतांना पोटभरे म्हणाले की, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास बौद्ध धम्म देऊन रूढी परंपरेने खिचपत पडलेल्या आपल्या बहुजनांना मानसिक गुलामीतून मुक्त केले व आपणास विज्ञानावर आधारित समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व  न्यायवादी असा पवित्र धम्म दिला. या धम्माचा आपण प्रसार व प्रचार केला पाहिजे. बौद्ध धम्माच्या विचाराशिवाय जगाला पर्यायच नाही असे पोटभरे म्हणाले. 
        यावेळी रिपाई तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, महादेव शिंदे, कृष्णा शिंदे, एकनाथ उजगरे, विजय गायकवाड, चरण पौळ, प्रदीप गायकवाड, बाबासाहेब शिंदे, भारत शिंदे, पिंटू शिंदे, विशाल पोटभरे, सचिन शिंदे, सिद्धार्थ शिंदे, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब शिंदे यांसह बहुसंख्य महिला, बालक व बौद्ध बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment