तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 25 October 2019

सिनेअभिनेत्री गिरीजा प्रभू यांनी तेजन्यूजहेडलाईन्स न्यूज पाेर्टलच्या तिस-या वर्धापण दिना निमित्त दिल्या शुभेच्छा.प्रतिनिधी
मुंबई:-मराठी चित्रपट  सृष्टीतील उभरती अभिनेत्री गिरीजा प्रभू यांनी तेजन्यूजहेडलाईन्स च्या तिस-या  वर्धापण दिना निमित्त या न्यूज वेब पाेर्टलचे  संपादक किरण घुंबरे पाटील आणि सर्व सहकारी प्रतिनिधींना न्यूज पाेर्टलच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या शुभेच्छा संदेशात सिनेअभेनेत्री गिरीजा गिरीश प्रभू म्हणतात की, पाथरी जि परभणी येथून तीन वर्षा पुर्वी सुरू झालेल्या या तेजन्यूजहेडलाईन्स या ऑनलाईन न्यूज चॅनल ला सुरूवात झाली.या वाहिनीचे  संपादक किरण घुंबरे पाटील आणि त्यांच्या संपुर्ण सहकारी टीम ला माझ्या कडून शुभेच्छा. या विषयीचा व्हिडिआे तयार करून त्यांनी तेजन्यूज चे संपादक किरण घुंबरे पाटील यांना पाठवला आहे.सिनेअभिनेत्री गिरीजा गिरीश प्रभू यांनी झी टीव्ही वरील जयमल्हार, दुरदर्शनच्या विकास सारथी,स्टार प्रवाहच्या लक्ष, विठूमाऊली, इ टिव्ही मराठी वर क्राईम, या मालिकां मध्ये प्रमुख भुमिका पार पाडल्या असून बाजार,काैल मनाचा, कायझालं कळेना, आसूड गाठ,तुझा दुरावा या मराठी चित्रपटात प्रमुख भुमिका साकारल्या आहेत . मुंबई येथे आगामी येणा-या  चित्रपटाच्या  चित्रिकरणाच्या व्यस्ततेतून त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शुभेच्छा संदेश देणारा व्हिडिआे संपादक किरण घुंबरे पाटील यांना पाठवला. या पुर्वी चार ऑक्टाेबर राेजी  त्या डॉ जगदिश शिंदे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्या साठी प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित हाेत्या. मराठी चित्रपट संघटनेचे उपाध्यक्ष असलेले तसेच जन्मभूमी फाऊंडेशनचे सक्रिय  सदस्य असलेले अनिवासी भुमिपूत्र राजेश माेरे यांच्या माध्यमातून त्यांनी संपादक किरण घुंबरे पाटील यांच्या निवास स्थानी पाथरी येथे भेट दिली हाेती. या वेळी त्यांनी या वाहिणीच्या यशाचे आणि सकारात्मक लिखाणाचे काैतूक  करत अशीच कामगिरी या व्यावसाईक पत्रकारीतेत अपेक्षित असल्याचे मत नाेंदवले  हाेते.या नंतर आता त्यांनी खास करून तेजन्यूज ला आणि त्यांच्या संपुर्ण टीम ला तिस-या  वर्धापण दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी उद्याेजक असलेले पुणे स्थित पाथरीचे भुमिपूत्र राजेश माेरे यांनी ही संपादक किरण घुंबरे पाटील आणि सर्व टीम तेजन्यूज ला शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a comment