तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजारपेक्षा अधिक बळी घेणारे गोलंदाज               सन १८७७ पासून अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाऊ लागले. प्रथम कसोटी क्रिकेटला सुरूवात झाली. त्यानंतर ९४ वर्षांनी म्हणजे सन १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट सुरू झाले. सन २००७ साली यामध्ये टि- २० या नव्या प्रकाराची भर पडली. या १४२ वर्षांच्या क्रिकेटच्या प्रवासात पाच हजारावर सामने खेळले यात एक हजारपेक्षा अधिक गोलंदाज आले. प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने छाप सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्व गोलंदाजांच्या भाऊगर्दीत केवळ दोनच गोलंदाज स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक हजारपेक्षा अधिक बळी मिळवू शकले. दुर्ववाने भारताचा आजवरचा सर्वोत्तम गोलंदाज अनिल कुंबळे या जादूई आकडयाच्या जवळ जाऊनही त्याला भोजा करू शकला नाही. अनिल कुंबळेची मजल केवळ ९५६ या आकडयापर्यंतच पोहोचली.

              एक हजार बळींचा टप्पा ओलांडणारे जे दोन महान गोलंदाज आहेत त्यातील अव्वल स्थानावर आहे श्रीलंकेचा ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन. तर दुसरा गोलंदाज आहे जगातील आजवरचा सर्वोत्तम लेगस्पिनर शेन वॉर्न.

              श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आपल्या वादग्रस्त गोलंदाजी शैलीने प्रथम प्रकाशझोतात आला. त्यानंतर आयसीसीनेच गोलंदाजांच्या गोलंदाजी करतानाच्या अॅक्शनमध्ये संशोधन करून अशा काही विचित्र शैलीच्या गोलंदाजांना दिलासा दिला. मुथय्या मुरलीधरन २२ जुलै २०१० रोजी कसोटीतून निवृत्त झाला. विशेष म्हणजे त्याने त्या कसोटीत स्वतः टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर बळी घेवून आपल्या बळींची संख्या विश्वविक्रमी ८०० या जादूई आकडयावर लॉक केली.

              मुरलीधरन त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण १३३ कसोटी खेळला. गोलंदाजी करताना ४३,६६९ चेंडू टाकले. एकूण ८०० बळी त्याने घेतले. एका डावात पाच किंवा अधिक बळी विक्रमी ६७ वेळा त्याने घेतले. तर २२ वेळा कसोटीचे दोन डाव मिळून सामन्यात १० किंवा अधिक बळी घेतले. बळी घेण्याची त्याची सरासरी होती २२.७२ इतकी. तर एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ५१ धावात ९ बळी. या दरम्यान ७२ झेलही त्याने घेतले.

                    ३४१ एकदिवसीय सामनेही तो खेळला. त्यामध्ये १८,३८५ चेंडू टाकताना ५१९ त्याने घेतले. सामन्यात पाच किंवा अधिक त्यापेक्षा बळी १० वेळा त्याला मिळाले. एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ३० धावात ७ बळी. शिवाय १२९ झेल त्याला वेगळेपण देऊन जाते. एकंदर १३१९ बळींची त्याची आंतरराष्ट्रीय कमाई ठरली.

                   या महान गोलंदाजांच्या अनोख्या क्लबमधील आणखी एक गोलंदाज आहे, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न !  शेन किथ वॉर्न हा अतिशय प्रभावशाली लेगस्पिनर ऑस्ट्रेलियाकडून  खेळला. त्याच्या कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाला जागतिक क्रिकेटमध्ये दिर्घकाळ अधिराज्य करता आले.

                शेन वॉर्न एकूण १४५ कसोटी खेळला. त्यामध्ये ४०, ७o४ चेंडू फेकताना ७०८ बळी त्याने मिळविले, ते २५.४१ च्या सरासरीने. कसोटीच्या एका डावात ५ किंवा अधिक बळी घेण्याची कामगिरी त्याने ३७ वेळा केली. तर सामन्यात १o वेळा १० किंवा अधिक बळी घेतले. ७१ धावात ८ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याच बरोबर १२५ फलंदाजांचे झेलही त्याने पकडले आहेत.

                  १९४ एकदिवशीय सामन्यात १०, ६४२ चेंडू फेकून २९३ फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. ३३ धावात ५ बळी हीच एकमेव सामन्यात पाच बळी घेणारी कारागिरी ठरली. ८० फलंदाज त्याच्याकडे झेल देऊन तंबूत परतले आहेत. एकूण १००१ फलंदाजांचे बळी त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत जमा झाले.


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment