तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

खेळ पैठणी चा या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक
खेळ पैठणीचा - गृहिणी नं १ या कार्यक्रमास सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सर्व महिलांचा आनंद द्विगुणीत करत या उपक्रमाचे कौतुक 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
ज्ञानबोधिनी शाळा विभाग व विद्यानगर विभागात अप्रतिम प्रतिसाद सौ.श्यामल साहेबराव गित्ते ज्ञानबोधनी विभागातून तर सौ.डॉ छायाताई अनंत मुंडे विद्यानगर विभागातून  विजेत्या ठरल्या                                       परळी वैजनाथ (प्रतिनिधी)....
       नवरात्र उत्सवा निमित्त मागील तीन वर्षा पासुन खास परळी शहरातील माता भगीनींसाठी दिलसे फाउंडेशनतर्फे घेण्यात येणारा महिला वर्गात आकर्षण ठरलेल्या खेळ पैठणीचा  - गृहिणी नं. १ ज्ञानबोधिनी शाळा विभागातून  सौ.श्यामल साहेबराव गित्ते ज्ञानबोधिनी शाळा विभागीय विजेत्या ठरल्या आहेत.               2.विद्यानगर विभागातून सौ.डॉ छायाताई अनंत मुंडे विद्यानगर विभागीय विजेत्या
           खेळ पैठणीचा - गृहिणी नं १ कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्ञानबोधिनी शाळा व विद्यानगर विभागात  महिलांचा लक्षणिय सहभाग लाभला. या वेळी गरबा ,संगीत खुर्ची, फुगे फुगवणे व फोडणे असे खेळ घेण्यात आले. सुप्रसिद्ध सुत्रसंचालक  विशाखा नांदगांवकर  यांच्या बहारदार व प्रवाही संचलनाने कार्यक्रम रंगतदार झाला. सहभागी माता भगिनींना हे खेळ खेळून लहानपणीची  आठवण झाली. संसाराच्या व्यापातून एक विलक्षण आनंदी क्षणांचा अनुभव या कार्यक्रमाने मिळवून दिला.   या उपक्रमास परळी शहरातील महिलांचा उत्स्फुर्तपणे भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 
         ज्ञानबोधिनी शाळा येथे किर्ती नगर, गंगासागर नगर, कृष्णा नगर,सिद्धेश्वर नगर,आदि भागातील ज्ञानबोधिनी शाळा विभागीय स्पर्धा पार पडली. या विभागातून सौ.श्यामल साहेबराव गित्ते विभागीय विजेत्या ठरल्या तर विद्यानगर विभाग, माणिक नगर,शास्त्री नगर,शारदा नगर,माधव बाग सोमेश्वर नगर कंडक्टर काँलणी पंचशील नगर परिसर आदि भागातील विद्यानगर विभागातून स्पर्धा पार पडली.या विभागातून सौ.डॉ छायाताई अनंत मुंडे विद्यागर विभागीय विजेत्या ठरल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलसे फाउंडेशन परिश्रम घेत आहे. 

  महिलांचा उत्साह आणि हिरीरीने सहभाग. ..
      दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम शहरात होत आहे. या उपक्रमाने महिला वर्गात प्रचंड क्रेज निर्माण केली आहे. याचा अनुभव बघायला मिळत असून ज्ञानबोधिनी शाळा व विद्यानगर विभागात झालेल्या आजच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह आणि हिरीरीने सहभाग हेच सिद्ध करणारा ठरला.

No comments:

Post a comment