तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

डॉ जगदीश शिंदे यांना गावागावातून युवक,शेतक-यांचा वाढता पाठिंबाप्रतिनिधी
पाथरी:-विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे  वारे आता गाव,वाडी ,तांड्यावर वाहत आहेत.दोन दिवसा पासून प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवार गावागावांत  जाऊन मतदारांच्या  भेटी गाठी घेत असून उमेदवार स्वत: सह नाते वाईकां सह गावोगावी  फिरत असल्याचे चित्र दिसत असून पाथरी तालुक्यात बहुरंगी  लढतीत सामाजिक कार्यकर्ते असलेले अपक्ष उमेदवार डॉ जगदीश शिंदे यांच्या कामगिरी कडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पाथरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आ मोहनराव फड, माजी मंत्री आघाडीचे उमेदवार सुरेशराव वरपुडकर, वंचित बहूजन आघाडीचे बाबर आणि समाजिक कार्यकर्ते असलेले अपक्ष उमेदवार डॉ जगदीश शिंदे हे पहिल्या टप्यात गावांगावात वैयक्तिक भेटीगाठीं वर लक्ष केंद्रीत करत असून. गेली दहा वर्षा पासून डॉ जगदीश शिंदे यांचा पगावातील गावातील शेतकरी,कष्टकरी, युवकांशी संपर्क असून या वेळी ते निवडणुकीच्या माध्यमातून प्रस्तापित नेत्यांना कडवी लढत देतील अशी अपेक्षा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. नवख्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉ शिंदे यांना जुन्या जाणत्यां प्रतिस्पर्ध्याचे आव्हाण असणार आहे. कुणावर ही टिका टिपन्नी नकरता स्वत:  दहा वर्षात समाजसेवेच्या माध्यमातून जनतेची केलेली सेवा आणि भविष्यात मतदार संघा साठी करावयाची कामे हा जाहिरनामा घेना ते लोकां समोर जातांना दिसत आहेत. डॉ शिंदे ना युवक,शेतकरी कष्टकरी मोठा प्रतिसाद देत असल्याचे चित्र प्रचाराच्या पहिल्या टप्यात दिसून येत आहे.

No comments:

Post a comment