तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 24 October 2019

डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा विक्रमी विजय कार्यक्रत्याचा जल्लोष

आरूणा शर्मा


पालम :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी तुरुंगातून विधानसभा लढवून 80605 मते घेऊन विजयी झाले आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील हा विजय त्यांच्याविषयी मतदार मधून मिळालेल्या भावनिकतेचा आहे. शिवसेनेचे विशाल कदम यांना 61809 मते पडली असून ते दोन नंबरचे उमेदवार राहिले आहेत. डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना 18 हजार 796 मतांची लीड मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाकडून एकमेव उमेदवार गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गंगाखेड शुगरचे चेअरमन डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी परभणी तुरुंगातून निवडणूक लढवली असून 80 हजार सहाशे पाच मते घेऊन दणदणीत विजय झाले आहेत. ही महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक निवडणूक ठरली असून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांना व राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सीताराम घनदाट यांना पराभव पत्करावा लागला आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना भावनिक होऊन दिलेला कोल हा अतिशय महत्त्वाचा असून महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक निवडणूक ठरली आहे. गंगाखेड येथे विजय मिरवणुकी मध्ये रासपचे सर्वे सर्व मंत्री महादेव जानकर, सुनील गुट्टे, राजेभाऊ फड, डॉ सिद्धार्थ भालेराव, प्रा.मनोहर धोडे, सुनिलभाऊ मुंडे, बाबा पोले, बाळासाहेब निरस, सुरेश बडगर, संदिप आळनूरे, हनुमंत लटपटे, अखिल आन्सारी, नंदू पटेल यांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तसेच पालम तालुक्यासह शहरात फटाक्याची अतिषबाजी व  जल्लोष करूण मिरवणूक काङण्यात आली यावेळी गुट्टेमित्र मडंळाचे तालुका अध्यक्ष साहेबराव सुरनर, जालिंदर हात्तिअंबिरे, भगवान सिरस्कर, सलमान खान पठाण, आठवले गटाचे जि.अध्यक्ष निवृत्ती हात्तिअंबिंरे, विनायक पौळ,   नगरसेवक आशदूला खा पठाण, विजय घोरपडे, उबेद पठाण, अजिम पठाण, मोबिन खुरेशी, गफार खुरेशी, मारोती शेगुळे, शेख गौस, शिवराम पौके, पठाण, बालाजी काळे धानेरकर, सुनिल शिंदे, ताहेर पठाण, नारायण दुधाटे (तात्या), माधव नंदेवार, गजानदं शेगुळे, शिवाजी भिस्के, सय्यद मुस्तखिम यासह असंख्य कार्यक्रते उपस्थित होते.

No comments:

Post a comment