तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

गडदेवाडी येथील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश ; ना. पंकजाताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा व्यक्त केला निर्धार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     गडदेवाडी येथील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथ गडदे यांच्यासह विद्यमान सदस्य व अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना परिसरातुन प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
       राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आज सोमवारी गडदेवाडी येथील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथ गडदे, सदस्य शेषराव गडदे, सुदाम गडदे, ग्राम पंचायत सदस्य बापुराव गडदे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते अशोक गडदे, सदाशिव गडदे, बापुराव गडदे, प्रल्हाद गडदे, श्रीमंत गडदे, बालासाहेब गडदे, विठ्ठल गडदे, विशांत गडदे, नारायण गडदे, राजेभाऊ गडदे, संतराम गडदे, सुजानराव गडदे, मोकिंदा गडदे, रमेश गडदे, गोविंद गडदे, अर्जुन हाके, चंद्रकांत गडदे, शंकर गडदे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यशश्री निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. 
     ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळाली आहे म्हणुन आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश करीत असुन या भागातून ना. पंकजाताई मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सर्वांनी दिली. सर्व कार्यकर्त्यांचे पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, युवानेते निळकंठ चाटे, बळीराम गडदे, संतराम गडदे, प्रा. बिभीषण फड, प्रा. आजय गित्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होत.

हिवरा गोवर्धनचे ग्राम पंचायत सदस्य भाजपात 

      दरम्यान हिवरा गोवर्धन येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्राम पंचायत सदस्य तात्यासाहेब भाऊराव घोडके यांनी आणि हानुमान घोडेके, वैजनाथ घोडके, हानुमान लांडे, हानुमान चिचाने पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 
  यावेळी वृक्षराज निर्मळ, प्रदीप रासवे, विनोद निर्मळ, बंडू निर्मळ आदींसह भाजपाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment