तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

धनंजय मुंडेंच्या परळीतील प्रचाराचा उद्या गणेशपार भागातून शुभारंभ; प्रभाग निहाय रॅली काढून मतदारांशी साधणार संवादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.08....... परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या परळी शहरातील प्रचाराचा शुभारंभ उद्या बुधवार दि.09 ऑक्टोबर रोजी शहराच्या गणेशपार भागातून होणार आहे. प्रभाग निहाय रॅली काढून कार्यकर्ते या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. 

धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅली आणि प्रचार सभेस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ही निवडणूक मतदारांनीच हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले असून, धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याने शहरातील त्यांच्या डोअर टु डोअर संपर्क अभियानाची जबाबदारी शहरातील आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. 

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक मतदारांच्या घरी जावून त्यांना आवाहन पत्र देणे व धनंजय मुंडे यांना मतदान करण्याची विनंती करणे असे नियोजन करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ गणेशपार भागातील जागृत गणेश मंदिरात दर्शन घेवून करण्यात येणार आहे. 

दुपारी 04 वा या प्रचार रॅलीस सुरूवात होणार असून, पहिल्या टप्प्यात प्रभाग क्र.4 व 15 मधील मतदारांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅलील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, शेकाप, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई, कवाडे गट, मानवी हक्क अभियान, मानवहित लोकशाही आघाडी, बहुजन विकास मोर्चा व मित्र पक्षांचे पदाधिकारी व प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

दररोज 2 ते 3 प्रभाग अशा पध्दतीने संपूर्ण परळी शहर पिंजून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रचाराच्या शुभारंभाच्या या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

या रॅलीचा मार्ग गणेशपार, काझीपार, इस्लामपूर बंगला, नांदूरवेस, चुकार गल्ली, आयशा कॉलनी, मोहम्मदीया कॉलनी, हनुमाननगर, गोपनपाळे गल्ली, ईटके गल्ली, सरकारवाडा, मुंजावरवाडा, भोईगल्ली असा राहणार आहे. 

No comments:

Post a comment