तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

आरे वृक्षतोड स्थगिती हा तमाम आंदोलकांचा विजय; हुकूमशाही प्रवृत्तीला चपराक - धनंजय मुंडेमुंबई (प्रतिनिधी) :- दि 7 -------मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोडीचा मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. पुढील सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने वृक्षतोड करण्यास स्थगिती दिली आहे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'आरे'तील वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत हा निर्णय स्वागतार्ह आहे. तमाम आंदोलकांचा हा विजय आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला ही चपराक आहे. अंतिम निर्णय ही 'आरे'च्याच बाजूने लागणार याचा मला विश्वास आहे. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी आरेच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. 

तसेच त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. जेव्हा 'आरे' उद्धवस्त होत होतं तेव्हा उद्धवजी ठाकरे मांडीला मांडी लावून जागावाटपाच्या वाटाघाटी करत होते. तेव्हा 'आरे'बाबत ब्र देखील काढला नाही. तुमचा फुकटचा कळवळा नकोय मुंबईकरांना. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास मनाई नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्यानंतर त्याच रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली. मात्र, सरकारकडून करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांसह विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. 

यावेळी न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली. “आरेतील झाडं तोडायला नको होती,” असे सांगतानाच “आरेतील वृक्षतोड तात्काळ थांबवा,” असे आदेश न्यायालयाने दिले. 

दरम्यान, आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांना अटक करण्यात आली होती. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनाही तात्काळ मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. पर्यावरण मंत्रालयालाही यात सहभागी करून घेण्यास न्यायालयाने सांगितले. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे ठेवण्याचे आदेश देत न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.

No comments:

Post a comment