तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

विकास कामे करणारे महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांनाच विजयी करा; जे.पी.नड्डा

 वि
श्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव/प्रतिनिधी
हि विधानसभा निवडणुक विकासाच्या बाबतीत निर्णय घेण्याची निवडणुक आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या सारख्या प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला पुन्हा संधी द्या आणि भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवा़ गेल्या पाच वर्षात महायुती सरकारने महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. त्यामुळे विकास हवा असेल तर भाजपला पर्याय नाही. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सेनगाव येथे दि.17 ऑक्टोबर गुरूवार रोजी आठवडी बाजार येथे आयोजित जाहिर प्रचार सभेत केले.
पाच वर्षा पुर्वी आघाडी सरकारने केवळ वेगवेगळी भ्रष्टाचाराची कामे करून महाराष्ट्राची प्रतिमा डागाळुन टाकली होती. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी दोन्ही काँग्रेस मध्ये संगीत खुर्ची सुरू होती. परंतु गेल्या पाच वर्षात देवेंंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही स्थिर सरकार दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न समजुन घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातुन १४ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना ६ हजार रूपयांचे मानधन उपलब्ध करून देण्यात आले. उज्वला योजनेच्या माध्यमातुन खेड्यापाड्यातील ८ कोटी महिलांना स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून देण्यात आला. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीब नागरीकांना आरोग्य सुविधा व उपचार मिळत आहे. समाजातील सर्व घटकांच्या विकासा करीता आम्ही बांधील आहोत. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचु लागल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांची पोटदुखी होत आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवून तळमळीने काम करणाऱ्या आ.तान्हाजी मुटकुळे यांना हिंगोली विधानसभा मतदार संघातुन विक्रमी मताने निवडुण देण्याचे आवाहन नड्डा यांनी केले.
आ.मुटकुळेंचे नड्डा यांनी विकास कामाबद्दल करून विविध विकास कामां करीता आ.तान्हाजी मुटकुळे हे राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आसतात. त्यांच्या या प्रयत्नामुळेच ना. नितीन गडकरी यांनी या विधानसभा मतदार संघात दोन राष्ट्रीय महामार्ग दिले. मुटकुळेंच्या पाठपुराव्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला़ तर सेनगाव सह अनेक ठिकाणच्या नळ योजना कार्यान्वीत झाल्या आहेत. त्यामुळे विकासा करीता सतत धडपडत राहणाऱ्या मुटकुळे यांना जनतेने मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन देखील नड्डा यांनी केले.यावेळी आ.तान्हाजीराव मुटकुळे, संघटन मंत्री रेणुकादास देशमुख, आ.रामराव वडकुते, माजी खा.शिवाजीराव माने, माजी आ.गजानन घुगे, हिगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर,भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख,आप्पासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,सेनगावचे प्रथम नगराध्यक्ष इजि अभिजीत देशमुख,शिवसेना नेते ऊध्दवराव गायकवाड,रामेश्वर शिंदे,रिपाई (आठवले गट)नेते दिवाकर माने,माजी जि.प.अध्यक्षा सरोजनी खाडे,शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रमोद पोहकर,भाजपा सेनगाव तालुकाध्यक्ष अशोक ठेगल,पुरुषोत्तम गडदे,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गिरधरजी तोष्णीवाल,शिवसेना सेनगाव शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,भाजपा किसान मोर्चा सेनगाव तालुकाध्यक्ष पंडीत तिकडे,भाजपा सेनगाव शहराध्यक्ष कैलास खाडे,हिम्मत राठोड,कातराव कोटकर आदीसह महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment