तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

हाळम फेस्टिवल अंतर्गत निबंध स्पर्धेत उस्फूर्त प्रतिसाद


विद्यार्थ्यांत गुणवत्तेसाठी स्पर्धा असावी - माधव मुंडे 
परळी (प्रतिनीधी)
परळीच्या ग्रामीण भागात सामाजीक कार्याची लोकचळवळ बनलेल्या हाळम फेस्टिव्हल अंतर्गत एक ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हाळम फेस्टिव्हल च्या माध्यमातुन सतत शैक्षणीक उपक्रम राबविले जात असुन आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेसाठी स्पर्धा असावी असे प्रतिपादन हाळम फेस्टिव्हल चे संयोजक माधव मुंडे यांनी केले.

 तालुक्यातील हाळम येथे मागील 12 वर्षांपासुन नवरात्रोत्सवात हाळम फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात येत आहे.या फेस्टिव्हल मध्ये   मंगळवार, 1 ऑक्टोंबर रोजी निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता 5 वी 7 वी गट व 8 वी 10 वी गटात पार पडलेल्या या निबंध स्पर्धेत  या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन  टिपरसे सर, शेख सर , गित्ते सर, दहिफळे सर, आंधोरीकर मॅडम यांनी सहकार्य केले
यावेळी सर्वांचे स्वागत ही करण्यात आले 
यावेळी हाळम फेस्टव्हलचे संस्थापक माधव मुंडे, संतोष गुट्टे, संतोष मुंडे , अजय गित्ते ,धनराज मुंडे,गणेश दहिफळे आदी उपस्थित होते
या स्पर्धेत प्रथम येणार्या विद्यार्थ्यास 1511 रु.प्रथम तर  1111 रु.द्वितीय बक्षीस ठेवण्यात आले आहे. बक्षीस वितरण सोमवार दि.7 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment